rat२४p५.jpg-
26O59309
रत्नागिरी : प्रभाग ६ मधील ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड वितरण शिबिरात नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचे स्वागत करताना विभागप्रमुख मनोज साळवी. सोबत नगरसेविका मेधा कुळकर्णी, उपविभाग प्रमुख नरेंद्र देसाई आदी.
---
ज्येष्ठांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : प्रभाग सहा मधील १८५ ज्येष्ठ नागरिकांनी एसटी वाहतुकीसाठी लागणारे एनसीएमसी कार्ड नोंदणी केली. नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्या सौजन्याने तसेच नगरसेवक राजीव कीर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते झाले. समृद्धी सर्विसेसचे संदीप चव्हाण, स्नेहा चव्हाण, मैथिली भोसले यांनी शिबिरार्थींची नोंदणी केली. नगरसेविका मेधा कुळकर्णी म्हणाल्या की, या कार्डची वैधता पाच वर्षांची असून कार्डसाठी दर महिन्याला रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी जेव्हा प्रवास करायचा असेल तेव्हा आपल्या गरजेनुसार कार्डमध्ये रक्कम भरावी. ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासासाठी सवलत मिळावी यासाठी हे कार्ड असणे महत्त्वाचे आहे. कार्डमध्ये शंभर रुपयापासून ते तीन हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकता. ज्या वेळी प्रवास करणार त्याचवेळी तिकिटाचे पैसे कट होणार आहेत. हे कार्ड ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष उपयुक्त असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट माफी, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तिकीट माफी, तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत पात्र महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक महिन्यानंतर हे कार्ड मिळणार आहे.
या शिबिरावेळी विभागप्रमुख मनोज साळवी, उपविभागप्रमुख नरेंद्र देसाई, उपशहरप्रमुख प्रिया साळवी, हरिश चौघुले, सोनाली सावंत, विशाखा भिडे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.