59323
स्ट्रीट लाईटच्या माहितीसाठी उपोषण
वजराट सरपंचांसह ग्रामस्थांचा महावितरणविरोधात रोष
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ : महावितरण प्रशासनाच्या सुशेगाद कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि वजराट गावातील स्ट्रीट लाईटच्या देखभाल-दुरुस्तीबाबतची माहिती त्वरित मिळावी, यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ग्रामपंचायत वजराट व ग्रामस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणात सरपंच अनन्या आनंद पुराणिक, उपसरपंच दीपिका दिनकर राणे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका साईप्रसाद केरकर, प्रियांका रविंद्र मेस्त्री, आणि शामसुंदर भास्कर पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून वजराट गावातील स्ट्रीट लाईटच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामावरून संभ्रम निर्माण झाला होता. या कामाची व जबाबदारीची लेखी माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने महावितरणला यापूर्वीच मागणी केली होती. मात्र, अनेक स्मरणपत्रे देऊन आणि अगदी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करूनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या सात दिवसांच्या आश्वासनाची मुदत संपूनही माहिती न मिळाल्याने, ग्रामस्थांना आज पुन्हा उपोषणाचे मार्ग अवलंबला. स्ट्रीट लाईटची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतचा लागू असलेला शासन निर्णय त्वरित उपलब्ध करून द्यावा. या कामाची नेमकी जबाबदारी व कार्यपद्धती लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात यावी. गावातील बंद व नादुरुस्त स्ट्रीट लाईटची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
--
भविष्यात आंदोलन अधिक तीव्र
या आंदोलनात ग्रामस्थ नितीन सावंत, आनंद पुराणिक, प्रेमानंद सावंत भोसले, साईप्रसाद केरकर, संदीप पेडणेकर, मनोहर परब आदींनी सहभाग घेतला. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन दखलपात्र कारवाई न केल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.