कोकण

कचरा जाळण्यास नगरपालिका व ग्रामपंचायतींवर निर्बंध

CD

कचरा जाळाल तर कारवाई अटळ!
जिल्हा प्रशासनाचे निर्देश; अन्यथा अधिकारीही जबाबदार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत उघड्यावर कचरा जाळण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याची अंमलबजावणी नवीन घनकचरा व्यवस्थापन धोरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात केली जाणार आहे. याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व ग्रामसेवकांना दिले आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात नवीन धोरण आणि ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६’ लागू केले आहे. या नवीन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत. नवीन कायद्यानुसार कोणत्याही अनधिकृत ठिकाणी कचरा टाकणे किंवा तो उघड्यावर जाळणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. असा कचरा तातडीने हटवून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कचरा व्यवस्थापनात निष्काळजीपणा झाल्यास किंवा उघड्यावर कचरा जाळल्यास संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना थेट जबाबदार धरून प्रशासकीय कारवाई केली जाईल. कचरा उघड्यावर न जाळता त्याची शास्त्रोक्त व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्लास्टिक, बागेतील सुका कचरा आणि इतर ज्वलनशील कचरा उघड्यावर जाळण्यावर तातडीने बंदी घालण्यात आली असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या शहरांत व गावांत नियमित गस्त घालणे, मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि जनजागृती मोहीम राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Gold Loan: Tata नंतर Birlaचीही गोल्ड लोनमध्ये एन्ट्री! सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याची क्रेझ का वाढली?

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Mumbai Local: ट्रेसपासिंग रोखण्यासाठी हॉर्नचा 'अलर्ट', संवेदनशील ठिकाणी मोटरमनला वारंवार सूचना; वेळापत्रकावर परिणाम

Marathi News Live Updates : रायफल-शूटिंग प्रशिक्षक शेख सादिक खान याला अटक

SCROLL FOR NEXT