कोकण

पर्यटन ठिकाणांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवा

CD

गुहागरच्या पर्यटनाला नवी दिशा द्या
संतोष रोकडे ः बैठकीत व्यावसायिकांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २५ ः आपल्या भागातील पर्यटन ठिकाणे निश्चित करून त्याबाबतची अचूक माहिती येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. टुरिस्ट गाईड तयार करा आणि स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल न केल्यास इतर कोणी येऊन त्याचा लाभ उठवेल त्यामुळे पर्यटनवाढीसाठी सर्वांनी मिळून शाश्वत पाऊले टाकावीत, अशा सूचना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) पर्यटन विभाग सहसचिव संतोष रोकडे यांनी दिल्या.
गुहागर येथील शासकीय विश्रामगृहात शहरातील पर्यटन व हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनी विविध प्रश्न व अडचणी मांडल्या. उद्योजकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती घेणे गरजेचे असून, विनाअभ्यास केलेला उद्योग नेहमीच तोट्याचा ठरू शकतो, असे रोकडे यांनी स्पष्ट केले. गुहागरमध्ये काय आहे याची माहिती देणारे फलक कोणत्याही मार्गावर किंवा चौकात लावलेले दिसत नाहीत. यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पर्यटन ठिकाणांची माहिती प्रत्येक वळणावर मिळणे आवश्यक आहे. आज मालवण आणि तारकर्ली पर्यटनाच्या क्षेत्रात पुढे आहेत. गोव्यासारखे वागू नका तर आपल्या भागातील निसर्गाचा आदर करून त्याचा पर्यटनासाठी योग्य वापर करा. प्रेमाने व संघटित राहूनच चांगले पर्यटन ठिकाण विकसित करता येईल तसेच रत्नागिरीमध्ये विमानतळ (एअरपोर्ट) होणे अत्यंत गरजेचे असून, ‘ब्लू फ्लॅग’ सारख्या प्रकल्पांचा लाभ घेण्यासाठी आणि पर्यटकांना प्रीमियम सेवा देण्याकरिता व्यावसायिकांनी नेहमी अपडेट राहिले पाहिजे. गुहागर तालुका अधिकृतपणे ‘पर्यटन तालुका’ म्हणून घोषित करावा यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन ‘पर्यटन विकास समिती’ स्थापन करावी. टुरिस्ट गाईड निर्माण करताना त्यांना विविध भाषांचे ज्ञान देणे आणि ‘स्किलिंग टूर ऑपरेटर’ म्हणून पुढे येणे गरजेचे आहे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. पर्यटन विकासासाठी जागांची व्यवस्था करून देण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. पर्यटन वाढवण्यासाठी जे सहकार्य लागेल ते शासनाकडून नक्कीच दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीस नीलेश दाते, श्री देव व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दूल भावे, श्यामकांत खातू, नगरसेविका वैशाली मावळणकर, विशाखा सोमन यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख पर्यटन व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Gold Loan: Tata नंतर Birlaचीही गोल्ड लोनमध्ये एन्ट्री! सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याची क्रेझ का वाढली?

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Rahul Gandhi Pune Visit : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; मुख्यमंत्र्यांना पत्रानंतर आता पुण्यातील उपोषणस्थळी देणार भेट

Marathi News Live Updates : भारतीय नौदल मुंबईतील नौदल गोदीत 'निस्तार' वर्गातील दुसरे 'डायव्हिंग सपोर्ट वेसल' असलेल्या 'निपुण' या जहाजाला सेवेत दाखल करणार

SCROLL FOR NEXT