कोकण

भातपिकापेक्षा तणाची उंचीच अधिक

CD

59750

भातपिकापेक्षा तणाची उंचीच अधिक

शेतकरी हैराण : कमी पावसाचा दुष्परिणाम, खिशाला कात्री

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २६ : भातरोप पुनर्लागवड करताना पावसाचा अभाव आणि लागवडीनंतर कमी पाऊस यामुळे भातपिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण दिसून येत आहे. पिकांपेक्षा तणाचे प्रमाण अधिक असल्याने ते काढताना शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे.
जिल्ह्यात लांबलेली भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. त्यापाठोपाठ नाचणीरोप पुनर्लागवड देखील पूर्ण झाली आहे. लागवड पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आता पिकांमधील तण काढणीला सुरुवात केली आहे. परंतु पावसाअभावी संपूर्ण पीक तणाने भरले आहे. भातखाचरामध्ये पिकांपेक्षा तणाची उंचीच अधिक वाढल्याचे चित्र शेतकऱ्यांना दिसून येत आहे. त्यामुळे तण काढणी करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक सुरू आहे.
साधारणपणे भातरोप पुनर्लागवड केल्यानंतर शेतकरी भातखाचरांमध्ये पाण्याची साठवण करून ठेवतात. मात्र यावर्षी भातरोप पुनर्लागवड करताना पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे चिखलणी करताना मळ्यांमध्ये पुरेसे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी कशीबशी रोप लागवड पूर्ण केली. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांना लागवडीनंतर भातखाचरांमध्ये पाण्याची साठवण करून ठेवता आली नाही. त्याचा मोठा परिणाम तणवाढीवर झाला आहे.
-------
खत देता येत नसल्याने कुचंबणा
सर्वच भागात पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. पिकांच्या तिप्पट खाचरामध्ये तण आहे. हे तण काढताना शेतकऱ्यांना मोठा खर्च येत आहे. ज्या ठिकाणी एक-दोन दिवसांत तण काढण्याचे काम पूर्ण व्हायचे, त्या ठिकाणी दहा-दहा दिवस काढणीकरिता लागत आहेत. तण काढणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पिकाला खत देखील देता येत नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT