तांबोळी-घारपीत
तीन बस फेऱ्या
ओटवणे ः गेल्या अनेक दशकांच्या मागणीनंतर अखेर सावंतवाडी आगारातून बांदा-डेगवेमार्गे तांबोळी-घारपी अशा तीन बसफेऱ्या मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या. यासाठी सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या बसेस सुरू झाल्या. सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे यांनी २०२४ मध्ये सावंतवाडीतून बांदा-डेगवे मार्गे असनिये-घारपी बससेवा चालू करण्यासाठी सावंतवाडी आगारप्रमुखांना निवेदन दिले होते. सावंतवाडी बसस्थानकातून तीन बस रोज घारपीपर्यंत धावणार आहेत. बससेवेचा प्रारंभ सुरुवातीला बांदा बसस्थानकात जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते व डेगवे येथे भाऊसाहेब देसाई यांच्या हस्ते झाला. सदानंद राणे, मधुकर देसाई, रवींद्र म्हापसेकर, केतनकुमार गावडे, भाऊसाहेब देसाई, मंगलदास देसाई, विजय देसाई, ग्रामस्थ उपस्थित होते.
............................
बागायतदार संघाची
वेंगुर्लेत उद्या सभा
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार शेतकरी संघाची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजता येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित केली आहे. या सभेत शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान, आंबा, काजू नुकसानभरपाई, जंगली प्राण्यांचा उपद्रव खते-कीटकनाशके भेसळ व शासनाच्या नवीन योजनांबाबत चर्चा होणार आहे. कृषी अधिकारी व प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडता येणार आहेत. आंबा काजू बागायतदार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेस बागायतदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव अॅड. प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.
.........................
इन्सुली विद्यालयात
आज वक्तृत्व स्पर्धा
सावंतवाडी ः इन्सुली विद्या विकास मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालय येथे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन उद्या (ता. २७) केले आहे. सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष महेंद्र सावंत उपस्थित राहणार आहेत.
..........................
वेंगुर्ले कॅम्प येथे
सोमवारी आमसभा
वेंगुर्ले ः पंचायत समितीची आमसभा सोमवारी (ता. ३१) सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात आमदार केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.