काही सुखद - लोगो
rat26p14.jpg
59800
प्रतीक मोरे
rat26p15.jpg
59801
डॉ. प्रताप नाईकवाडे
rat26p16.jpg
59802
स्मोक वॉटर तंत्रज्ञान
---------
कचऱ्याच्या धुरातून वनस्पती संवर्धनाची नवी दिशा
देवरूखच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता; ‘स्मोक वॉटर’ला इंग्लंडचे डिझाईन पेटंट
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २६ : शेती व वनस्पतीजन्य कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारा धूर म्हणजे प्रदूषण, ही रूढ धारणा आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच धुरातील जैवसक्रिय घटकांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून वनस्पतींची वाढ, बियांची उगवण क्षमता आणि दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या अभिनव ‘स्मोक वॉटर’ तंत्रज्ञानाला इंग्लंडचे डिझाईन पेटंट मिळाले असून, देवरूखच्या संशोधन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण ओळख मिळाली आहे.
वनस्पतीजन्य जैवभाराचे नियंत्रित ज्वलन करून त्यातून निघणाऱ्या धुराचे शुद्धीकरण केले जाते. हा धूर पाण्याच्या संपर्कात आणल्यानंतर त्यातील पाण्यात विरघळणारे जैवसक्रिय (उदा. कॅरिकिन्ससारखी संयुगे) घटक पाण्यात मिसळतात. त्यातून तयार होणाऱ्या द्रवाला ‘स्मोक वॉटर’ म्हणतात. कॅरिकिन्ससारखी संयुगे बियांची सुप्तावस्था कमी करून अंकुरणाला चालना देतात. त्यामुळे वनस्पतींच्या वाढीवर आणि जीवनचक्रावर सकारात्मक परिणाम होतो. या संशोधनात देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रताप नाईकवाडे, ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे तसेच ठाणे येथील आर. के. टी. महाविद्यालयातील संशोधकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
दुर्मीळ वनस्पतींच्या संवर्धनाला नवी दिशा
काही महत्त्वाच्या व दुर्मीळ वनस्पतींच्या बियांमध्ये नैसर्गिक सुप्तावस्था असल्याने अनुकूल वातावरणातही त्यांचे अंकुरण लवकर होत नाही. अशा वेळी धूरजन्य जैवसक्रिय घटकांचा नियंत्रित वापर केल्यास अंकुरण प्रक्रियेला मोठी चालना मिळते. त्यामुळे स्थानिक, दुर्मीळ आणि संवर्धनाच्यादृष्टीने महत्त्वाच्या वनस्पतींच्या बियांची उगवण क्षमता वाढवून त्यांच्या संरक्षणासाठी ‘स्मोक वॉटर’ तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
कोट
काही महत्त्वाच्या व दुर्मीळ वनस्पतींच्या बियांमध्ये नैसर्गिक सुप्तावस्था असल्याने योग्य वातावरण असतानाही त्यांचे अंकुरण लगेच होत नाही. अशा वेळी धूरजन्य जैवसक्रिय घटकांच्या नियंत्रित वापरामुळे अंकुरण प्रक्रियेला मोठी चालना मिळते. दुर्मीळ, स्थानिक आणि संवर्धनाच्यादृष्टीने महत्त्वाच्या वनस्पतींच्या बियांची उगवण क्षमता वाढवून त्यांच्या रक्षणासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
- प्रतीक मोरे, कार्यकारी संचालक, सह्याद्री संकल्प सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.