कोकण

रक्षाबंधन सणाला महागाईची झळ

CD

swt२६१९.jpg
५९८०७
तळेरे : बाजारपेठेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी सजविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक राख्या.(छाया : एन. पावसकर)

रक्षाबंधन सणाला महागाईची झळ
राख्यांची विक्री मंदावली : शेवटच्या दिवसांत खरेदी वाढण्याची विक्रेत्यांना आशा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही येथील बाजारपेठेतील राख्यांची विक्री मंदावली आहे. महागाईमुळे राख्यांच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांकडून खरेदी करताना बजेटचा विचार केला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, सण जवळ आल्याने शेवटच्या काही दिवसांत विक्रीला वेग येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.
तळेरे बाजारपेठेत रंगीबेरंगी डिझाईन, मोती, कार्टून, झरी, पारंपरिक तसेच विविध आकर्षक डिझायनर राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. लहान मुलांसाठी कार्टून व प्रकाशझोतात चमकणाऱ्या राख्या, तर तरुणांसाठी विविध डिझायनर राख्या उपलब्ध आहेत. महिलांकडूनही भावांसाठी विशेष राख्यांची खरेदी केली जात आहे.
कच्चा माल, वाहतूक खर्च आणि सजावटीच्या साहित्याच्या दरवाढीमुळे यंदा राख्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात पाच रुपयांपासून १०० ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध असून, विविध दरांतील पर्याय ग्राहकांना देण्याचा प्रयत्न विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण असल्याने शेवटच्या काही दिवसांत बाजारपेठेत गर्दी वाढून विक्रीला चालना मिळेल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही ग्राहकांकडून पारंपरिक राख्यांना पसंती दिली जात असली, तरी नव्या पिढीतील ग्राहकांमध्ये आकर्षक, डिझायनर आणि कार्टून राख्यांची मागणी वाढताना दिसत आहे. बहिणींकडून भावांसाठी त्यांच्या आवडीनुसार राखी निवडण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढण्याची शक्यता आहे.


चौकट
यंदाच्या राखी बाजाराची वैशिष्ट्ये
* पाच ते २०० रुपयांपर्यंत विविध राख्या
* मोती, झरी, डिझायनर व कार्टून राख्यांना मागणी
* महागाईमुळे किमतीत वाढ
* सध्या विक्रीचा वेग मंद
* शेवटच्या दिवसांत खरेदी वाढण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT