कोकण

चिपळूणमधील 5 पंचक्रोशीमध्ये वन्यप्राण्यांचा धुडगुस

CD

rat26p9.jpg-
59837
चिपळूण ः दसपटी विभागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. कृपाल शिंदे आणि रणजीत शिंदे यांनी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांची भेट घेतली.

कोळकेवाडी, अलोरे-पोफळीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
वनाधिकाऱ्यांकडे तक्रार; नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी, माकड, सांबर, रानडुकरांचा त्रास
चिपळूण, ता. २६ : तालुक्यातील कोळकेवाडी गावासह अलोरे, पोफळी, शिरगाव पंचक्रोशी आणि दसपटी परिसरातील गावांमध्ये माकड, सांबर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही समस्या वनविभागाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी मागणी गोपाळराव शिंदे यांनी केली आहे.
वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत रणजीत शिंदे आणि डॉ. कृपाल शिंदे यांनी मंगळवारी (ता. २५) विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांची भेट घेतली. वन्यप्राण्यांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चाही केली. दसपटी परिसरातील अनेक शेतकरी भातशेतीसह विविध पिकांवर अवलंबून आहेत. जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे. विशेषतः माकड, सांबर आणि रानडुक्कर यांचा त्रास वाढला आहे. पिके तयार होण्याच्या कालावधीत शेतात घुसून वन्यप्राणी नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात आली.

कोट
शेतीच्या नुकसानीबाबत नियमानुसार पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरीसहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, शेतकऱ्यांनी त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती वेळेवर वनविभागाला द्यावी म्हणजे पाठपुरावा करायला सोपे होईल.
- गिरिजा देसाई, विभागीय वनाधिकारी, चिपळूण

कोट
वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि शेतकऱ्यांचे हित यामध्ये समतोल राखत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देणे तसेच भविष्यात होणारे नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- डॉ. कृपाल शिंदे

कोट
कोळकेवाडी, अलोरे-शिरगाव पंचक्रोशी आणि दसपटी परिसरातील वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर द्यावा, शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन आणि वनविभागाने समन्वयाने काम करावे.
- रणजीत शिंदे, कोळकेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT