rat20p9.JPG-
65174
चिपळूण ः गरजू महिलांना घरघंटी व शिलाई मशिनचे वाटप करताना भाजप पदाधिकारी.
चिपळूण भाजप शहराध्यक्षांकडून
महिलांना शिलाई मशीनचे वाटप
चिपळूण, ता. २० : भाजप चिपळूण शहर मंडलाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील १२ गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी, शिलाई मशीन व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. परशुराम नगरातील स्वामी बिल्डिंग येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांना केवळ तात्पुरती मदत देण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू म्हणाले, "पक्षाचे उपक्रम समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चिपळूण शहर मंडळ सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल." तर नगरसेविका अंजली कदम यांनी महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याला बळ देणे होय, असे सांगत या उपक्रमामुळे महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, नगरसेविका अंजली कदम, शहर सरचिटणीस सारिका भावे, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, रुई खेडेकर, स्वाती देवळेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.