यंदाच्या मुंबईतील गणेशोत्सवात अडथळे आणि संकटांची मालिका काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. यावर्षीच्या गणेश आगमन सोहळ्यात मुंबईत काही गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता दक्षिण मुंबईतील काळाचौकी येथील महागणपती मंडळाच्या परिसरात विजेचा धक्का बसून एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून पाच जण जखमी झाले आहेत.