कोकण

एकजुटीने काम केल्यास ऐक्याला बळकटी

CD

एकजुटीतून समाजविकासाला बळ द्या
मुराद अडरेकर ः मुस्लिम समाजसंघाची सभा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : सर्वांच्या सहकार्याने समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे काम करा. एकनिष्ठेने आणि एकजुटीने काम केल्यास सामाजिक एकोपा व ऐक्याला बळकटी मिळेल, असे प्रतिपादन अध्यक्ष मुराद अडरेकर यांनी केले.
मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथे झालेल्या रत्नागिरी जिल्हा मुस्लिम समाजविकास संघाच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेत मागील वर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले. तसेच मागील वर्षातील विविध ठराव, जमाखर्चाचा तपशील, प्रलंबित प्रश्न आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सभेत मांडण्यात आली. गेल्या दोन वर्षांत संघटनेने सामाजिक प्रश्नांवर केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. समाजसुधारणेच्यादृष्टीने राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यानंतर जिल्हा व तालुकास्तरावर मुस्लिम समाजासमोर असलेल्या विविध सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक विकासासाठी पुढील काळात कोणत्या पद्धतीने काम करावे याबाबत रशीद दाभिळकर, मुश्ताक मिरकर, जमीर माखजनकर, फैरोज उकये, कैसर वलेले, सिकंदर जोगिलकर, अब्दुल रऊफ खतीब, नगरसेवक मुल्लाजी, म्हाते सर, सचिव महमद हुसैन मुसा आणि खजिनदार जावेद सारंग यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विचार मांडले. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी विविध महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले. अहमद नाडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT