कोकण

खेड-18 महिन्यांत 2780 पासपोर्ट अर्जांची नोंद

CD

१८ महिन्यांत २७८०
पासपोर्ट अर्जांची नोंद
२६५५ अर्जांची पडताळणी पूर्ण; २६००हून अधिक नागरिकांना पासपोर्ट
खेड, ता. ९ : उच्चशिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि पर्यटनासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी खेड पोलिसांची पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया गतिमान झाली आहे. एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२६ या १८ महिन्यांत खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २७८० पासपोर्ट अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २६५५ अर्जांची पोलिस पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, २६००हून अधिक नागरिकांना प्रत्यक्ष पासपोर्ट मिळाला आहे.
पासपोर्ट अर्जांपैकी ९५ टक्के अर्जदारांना पासपोर्ट मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. २७८० अर्जांच्या ९५ टक्के प्रमाणानुसार ही संख्या सुमारे २६४१ होते. दरम्यान, एकूण अर्ज आणि पूर्ण झालेल्या पडताळणीमध्ये १२५ अर्जांचा फरक असून, यातील ७५ पेक्षा कमी अर्जांमध्ये कागदपत्रांशी संबंधित त्रुटी असल्याचे सांगण्यात आले आहे. पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोलिस ठाण्यातील डिजिटल प्रणालीमुळे अर्जदारांना वारंवार पोलिसात येण्याची गरज कमी झाली आहे. रहिवासी पुरावे, आधारकार्ड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करून अहवाल ऑनलाईन पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवला जातो. सरासरी ७ ते १० दिवसांत पडताळणी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वेळेत पडताळणी झाल्यामुळे परदेशातील उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी तसेच रोजगारासाठी जाणाऱ्या तरुणांना पासपोर्ट व व्हिसा प्रक्रियेत फायदा होत आहे.
------
कोट १
कागदपत्रांची अचूकता आणि पारदर्शकता तपासून पडताळणी अहवाल तातडीने पाठवण्यास प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांना वेळेत पासपोर्ट मिळून त्यांचा परदेशगमनाचा मार्ग सुकर व्हावा, हे आमचे प्राधान्य आहे.
- विवेक अहिरे, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

SCROLL FOR NEXT