Rajat Patidar back-to-back fifties against Australia A
esakal
Rajat Patidar back-to-back fifties against Australia A: भारत अ संघाला दुसऱ्या वन डे सामन्यातही ऑस्ट्रेलिया अ संघाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या २७५ धावांचा पाठलाग करणारा भारताचा संघ ४५.२ षटकांत २०६ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाने ६९ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी होत असलेल्या या मालिकेकडे निवड समितीचे लक्ष आहे आणि त्यामुळेच वन डे संघ जाहीर होण्यास विलंब होत आहे. भारताने दोन्ही सामने गमावले असले तरी एका खेळाडूने आपली छाप पाडली आणि त्याने किवी दौऱ्यासाठी दावा ठोकला आहे.