Health Department raigad esakal
कोकण

Raigad News : विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण

महाड तालुक्यातील विन्हेरे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुमारे ३० हून अधिक गावांसाठी हे आरोग्य केंद्र उपयुक्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mahad News : तालुक्यातील दक्षिणेकडील गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा मिळावी, या करता उभारण्यात आलेल्या विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम दुर्गम भागातील आरोग्य सेवांवर होत आहे.

महाड तालुक्यातील विन्हेरे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुमारे ३० हून अधिक गावांसाठी हे आरोग्य केंद्र उपयुक्त आहे. या भागातील ग्रामस्थांना कोणतीही आरोग्यसेवा मिळवण्यासाठी शहरामध्ये पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.

त्यामुळे हे आरोग्य केंद्र रुग्णांना महत्त्वाचे ठरत आहे. आरोग्य केंद्रात सद्यःस्थितीमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी असून ते बीएएमएस पदवीधर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदवीधर असणे गरजेचे आहे, परंतु येथे एमबीबीएस डॉक्टर नाही.

त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी महाड येथे दाखल व्हावे लागते. केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच अन्य पदेही रिक्‍त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त भार पडतो. कनिष्ठ साहायकाचे एक पद रिक्त आहे तर शिपायांची दोन्ही पदे रिक्त आहेत.

आरोग्य परिचारिकांची पाचपैकी चार पदे रिक्त आहेत. फार्मासिस्ट, सुपरवायझर ही पदेही रिक्‍त आहेत.मुंबई गोवा महामार्गाला असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी तुळशी खिंड मार्ग याच भागातून जात असून वाहनांची सतत वर्दळ असते.

त्‍यामुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज मोठ्या प्रमाणात भासते. ग्रामीण भागामध्ये शेतीच्या हंगामात विंचू दंश, सर्प दंश, श्वान दंश अशा घटनांमध्ये वाढ होत असते.

गर्भवतींनाही जवळच्या सरकारी दवाखान्यात प्रसुतीसाठी करावी, असे सरकारकडून सूचवण्यात येत असल्‍याने प्राथमिक आरोग्य केंद्राला कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. महाडमध्ये दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्‍णालयाला मंजुरी मिळाली आहे. एका बाजूला नवीन रुग्णालय मंजूर होत असताना जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था मात्र बिकट आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ग्रामीण भागातील जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांची जास्त प्रमाणात निकड आहे. खासगी आरोग्य सेवा परवडणारी नाही व ती अंतराने देखील दूर असल्याने विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदे वरून सुस्थितीत करावे.
- विजय सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT