कोकण

युद्धामुळे कंपन्यांवर अनिश्चिततेचे ढग

CD

युद्धामुळे कंपन्यांवर अनिश्चिततेचे ढग
परिस्थिती पूर्ववत न झाल्यास ४० हजार कंपन्यांना टाळे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : इराण-अमेरिका युद्धाचा फटका भारतातील लघू आणि मध्यम उद्योगांना बसला असून, गॅस, काच आणि पेट्रोकेमिकल्सच्या तुटवड्यामुळे पुरवठा साखळी कोलमडली आहे. विशेषतः राज्यातील पुणे, ठाणे, नवी मुंबई, वाशी येथील कारखान्यांवर संकट कोसळले आहे. येत्या तीन महिन्यांत परिस्थिती पूर्ववत न झाल्यास ४० हजार कंपन्यांना टाळे लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कच्चा माल न मिळाल्याने गॅस, पेट्रोकेमिल्स, काच आणि प्लास्टिकवर अवलंबून असणाऱ्या अनेक कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. कच्‍च्‍या मालाच्या किमती वाढल्या असून तयार मालाला वाढीव दर मिळत नसल्याने उद्योजक अडचणीत सापडले आहेत. भारतातील ४० टक्के कंपन्या पेट्रोकेमिकल्सवर अवलंबून आहेत. विशेषतः फार्मा कंपन्यांना काचेच्या बाटल्यांची आवश्‍यकता असते, मात्र त्याचा तुटवडा आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या बॉटलसाठी आवश्यक रेझिन मिळत नसल्याने उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. कित्येक कारखान्यांनी उत्पादन कमी केले असून, कामगार कपातही करण्यात आली आहे. परिणामी या महिन्यात जीएसटी संकलन कमी होणार आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

मध्य पूर्व आशियातील युद्धामुळे पेट्रोकेमिकल्स तुटवडा आहे. लघू-मध्यम उद्योगांना आवश्यक गॅस, काच, प्लास्टिक अशा कच्‍च्‍या मालाचा तुटवडा भासत आहे. जो माल मिळत आहे तो महाग आहे. तर विक्रीला वाढीव किंमत मिळत नसल्याने अनेक उद्योजकांवर कंपन्या बंद करण्याची वेळ आली आहे. सरकारने योग्य पाऊल उचलले नाही तर येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात ४० हजार कंपन्या बंद होतील.
- चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT