Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Axar Patel reaction after DC vs RCB collapse IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून झालेल्या दारुण पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल पूर्णपणे गोंधळलेला दिसला. सामन्यानंतर बोलताना त्याने स्पष्टपणे सांगितले की, “मलाच अजूनही समजत नाही काय घडले.”
Axar Patel looks disappointed after Delhi Capitals’ shocking collapse against RCB

Axar Patel looks disappointed after Delhi Capitals’ shocking collapse against RCB

esakal

Updated on

What Axar Patel said after Delhi Capitals loss Against RCB? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी मागील तीन दिवस विचित्रच होते म्हणावे लागेल... शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध २६४ धावांचा डोंगर उभा करणारा दिल्लीचा हाच संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ७५ धावांवर ऑल आऊट झाला. बरं, २६४ धावा करूनही हा संघ जिंकला नाहीच, त्यामुळे आज त्यांच्याकडून केवळ ७५ धावांचा यशस्वी बचावाची अपेक्षा करणेच फोल होते. तीन दिवसांत बरंच काही घडल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलही ( Axar Patel) कन्फ्युज झाला. RCB कडून लाजीरवाणा पराभव पत्करल्यानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया मजेशीर होती...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com