कोकण

विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर अंत्यसंस्कार

CD

18661
विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (ता. ८) मध्यरात्री निधन झाले. वांद्रा पूर्वेच्या टिचर्स कॉलनी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी साडेपाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालजवळ असलेले कुसबे (ता. कुडाळ) हे त्यांचे मुळ गाव होय.
त्यांच्या मागे पत्नी माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगा प्रसाद, मुलगी प्रांजल असा परिवार आहे. आज दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव सांताक्रूझ (पूर्व) येथील राजे संभाजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी तेथे अंत्यदर्शन घेतले. महाडेश्वर गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे यांच्या महाड येथील सभेलाही त्यांनी हजेरी लावली होती. दोन दिवसांच्या दगदगीनंतर मुंबईला परतल्यावर सोमवारी त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. त्यानंतर ते घरी गेले. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच चटका लावून गेला.
शिवसेनेचे खंदे समर्थक, अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. ते २००२ मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते २००३ मध्ये महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष झाले. ते २००७, २०१७ मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. त्यांची २०१७ मध्ये मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती. त्यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे काम होते. राजे शिवाजी विद्यालय या शिक्षण संस्थेचे ते संस्थापक संचालक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT