मुंबईत १७.७ कोटींचे
चिनी फटाके जप्त
जेएनपीए बंदरात कारवाई
उरण, ता. २७ : उरणमधील जेएनपीए बंदरात महसूल गुप्तचर संचालयाने कारवाई करत १७.७ कोटींचे प्रतिबंधित चिनी फटाके जप्त केले. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जेएनपीए बंदरात तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आलेल्या प्रतिबंधित चिनी बनावटीच्या फटाक्यांवर महसूल गुप्तचर संचालयाने ‘फायरो हेस्ट’ मोहिमेंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार कंटेनर जप्त केले असून, सुमारे १७.७ कोटी रुपये किमतीचे ७० टन फटाके हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
भारतात चिनी फटाक्यांवर संपूर्ण बंदी असल्याने सीमा शुल्क तपासणी टाळण्यासाठी हा माल बनावट वस्तूंच्या नावाखाली घोषित करण्यात आला होता. चीनमधून आयात केलेल्या या फटाक्यांचा साठा कंटेनरचे सील तोडून जेएनपीए परिसरातील एका कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये (सीएफएस) दुसऱ्या वाहनात हलवण्याचा प्रयत्न संशयित करत होते. या वेळी महसूल गुप्तचर संचालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोघांना पकडले. दोघेही कंटेनरच्या सीलमध्ये छेडछाड करत असल्याचे आढळून आले. ही संपूर्ण कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.