फोटो आहे
सचिन-सुप्रियांनी घेतले
पुण्यात गणरायाचे दर्शन
चित्रपटाच्या घोषणेपासून चर्चेत असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. २०) सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी महाआरती देखील केली.
‘माझी आणि सुप्रियाची गणरायावर प्रचंड श्रद्धा आहे. आज गणरायाची आरती करण्याचा मान आम्हाला मिळाला, याचा आनंद आहे. यातून आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. ‘नवरा माझा नवसाचा- २’ या चित्रपटाचा खरा नायक देखील गणरायाच आहे. मात्र ते कसे, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. निखळ मनोरंजनासह या चित्रपटात एक प्रेमकथाही आहे. खूप काळानंतर सहकुटुंब पाहावा, असा चित्रपट येत आहे’, अशी भावना सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली. सुश्रिया चित्र यांची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. दमदार कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गीते अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.