‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटावर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश ‘महारेरा’ने दिला आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटाकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.
रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा १६ फेब्रुवारीपासून आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग एवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
(प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२)
व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च तसेच ७ व ८ मार्च रोजी करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडीओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स,ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.