from tomorrow heavy vehicles ban on the Mumbai Goa highway
from tomorrow heavy vehicles ban on the Mumbai Goa highway 
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी

सुनील पाटकर

महाड : गणेशोत्सव काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. गणेशभक्तांची ही गैरसोय टाळण्यासाठी 8 सप्टेंबरपासून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीची वेळ व तारीख रायगड पोलिसांकडून प्रवासी व वाहनचालकांसाठी जारी करण्यात आली आहे. गृह (परिवहन)विभाग यांच्या कार्यालयीन आदेशानुसार ही बंदी लागू होणार आहे.

अशी आहे वाहतूक बंदी

* 8 सप्टेंबरला सकाळी आठपासून 9 सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत तसेच 10 सप्टेंबर रात्री आठ ते 13 सप्टेंबर रात्री आठ या कालावधीत ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक,मल्टीएक्सल, ट्रेलर) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

* 17 सप्टेंबर सकाळी 8.00 ते सप्टेंबर रात्री आठ वा या कालावधीत  16 टन किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची सर्व प्रकारची अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
* 23 सप्टेंबर सकाळी 8.00 ते दिनांक 24 सप्टेंबर रात्री आठ या कालावधीतही सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

* 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर व 21 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत 16 टन किंवा 16 टना पेक्षा जास्त क्षमतेच्या आहे सर्व वाहनांनां सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या वेळेत बंदी राहील. सदर कालावधीत या वाहनांना रात्री 8.00 ते सकाळी 8.00 वाजेपर्यत वाहतूक करण्यास परवानगी राहील 

* 11 सप्टेंबरला रात्री बारापासून ते 24 सप्टेंबरला रात्री 8.00 वा पर्यत वाळू /रेती  व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणा-या वाहनांना पूर्ण बंदी असणार आहे. दूध, पेट्रोल व डीझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल, ऑक्सिजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक करणारी वाहने यातून वगळण्यात आली आहेत.    

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती काम सुरु असुन यासाठी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. परंतु यासाठी वाहतूकदारांनी संबंधित वाहतूक विभाग तसेच महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घ्यावे असे रायगड पोलिस दलाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT