Transportation of Mango through ST starts from 5 April  
कोकण

लालपरीतून पाच एप्रिलपासून आंबा वाहतूक; राज्यभर पाठवणे शक्य

सकाळवृत्तसेवा

राजापूर - ( रत्नागिरी ) - वाढत्या कोरोनाच्या संसर्गामध्ये गतवर्षी आंबा व्यापाऱ्यांसह थेट लोकांपर्यंत पोहचविण्यामध्ये अडचणी आल्या होत्या. आंबा बागायतदारांसह व्यापाऱ्यांची ही व्यथा लक्षात घेऊन यावर्षी सर्वसामान्यांची लालपरी (एसटी) आंबा वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. विविध भागामध्ये हापूस आंबा एसटी गाड्यांद्वारे लोकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय एसटी विभागाने घेतला आहे. त्यासाठी एसटी गाड्याही सज्ज झाल्या आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या लॉकडाउनचा फटका एसटीला बसला. आर्थिक नुकसानीच्या टंचाईच्या खाईतून बाहेर पडण्यासाठी एसटी विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये एसटी गाड्यांमधून हापूस आंब्याच्या पेट्यांची वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हापूस आंबा पेट्यांची वाहतूक करण्यासाठी एसटी विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यासाठी 30 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 20 मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहेत. या प्रत्येक मालवाहू ट्रकवर एक चालक देण्यात येणार असून 5 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत ही वाहने व चालक संबंधित आगारात कार्यरत राहणार आहेत. याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांसह आंबा व्यापाऱ्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची वाहतूक करण्याला होणार आहे. 

येथे आंबा पाठवणे शक्‍य 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण भागातून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व इतर जिल्ह्यामध्ये एसटी गाड्यांद्वारे आंबा वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल किंवा परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, ठाण्यामध्ये ठाणे-1 किंवा ठाणे-2, भिवंडी, बोरिवली-सुकुरवाडी किंवा कल्याण, पुणे पिंपरी-चिंचवड यासह सांगली, सातारा, कोल्हापूरला आंबा पाठवता येईल. 

असे आहेत दर 
आंबापेट्यांच्या वाहतुकीसाठी 300 किमीपासून ते 1500 किमीपर्यंत 5 डझन आंब्याच्या पुठ्ठ्याच्या पेटीसाठी 40 रुपयापासून 190 रुपयांपर्यंत दर निश्‍चित करण्यात आले आहेत. तर, लाकडी पेटीसाठी 50 रुपयापासून 250 रुपयांपर्यंत दर ठेवण्यात आले आहेत. दोन डझन पेटीसाठी 25 पासून 110 रुपये दर आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT