Truck accident in Kashedi Ghat One serious in ratnagiri 
कोकण

कशेडी घाटात एका वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला अन्....

सकाळ वृत्तसेवा

खेड  (रत्नागिरी) : महामार्गावरील अवघड कशेडी घाटात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमाररास पांढरी वाळूवाहून नेणाऱ्या  ट्रकला झालेल्या अपघातात क्लिनर शेजारी बसलेली ६५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली. ट्रक दरडीवर आदळल्याने नंतर ही व्यक्ती ट्रक आणि दरडीच्या मध्ये अडकली होती. ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार

मुंबईहून रत्नागिरीकडे पांढरी वाळू घेऊन जाणारा ट्रक कशेडी घाट उतरत असताना एका वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला हा लोडेड ट्रक समोरच्या दरडीवर जावून आदळला. या अपघातात लक्ष्मीभाय राहणार गुजरात ही व्यक्ती दरड आणि ट्रक यामध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाली. 

अपघाताची खबर मिळताच आजुबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. टूरकमध्ये अडकलेली व्यक्ती वेदनेने विव्हळत होती. त्या ठिकाणी पोहचलेल्या ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी पोहचलेले नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक मुकंद मोरे यांनी त्या व्यक्तिला रुग्णवाहिकेतून तात्काळ  कळंबणी उपजिल्हा रुग्णालायत दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Meeting : अभिजीत दीपकेंची राजकारणात एन्ट्री? 'सीजेपी' प्रवक्ते आशुतोष रांका अन् अखिलेश यादवांच्या भेटीने वाढला सस्पेंस

Maharashtra Artificial Rain: कर्नाटकात कृत्रिम पावसाचा प्रयोग, महाराष्ट्रात मात्र ‘उशीर’; तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितले वास्तव..

Career Astrology: अधिकारी होण्याचं स्वप्न पाहतात, पण यश मिळत नाही; ‘या’ राशीच्या लोकांना करिअरमध्ये वारंवार अपयश का येतं?

Marathi News Live Updates : रात्री उशिरा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे उपोषणावर ठाम; चर्चा ठरली निष्फळ

Nepal Flood: नेपाळवर पुन्हा पुराचे सावट! मृतांची संख्या १,२५२ वर; नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा धोका

SCROLL FOR NEXT