

Artificial Rain Experiment In Karnataka Maharashtra Faces Delay Experts Explain Why Cloud Seeding Is Not Possible This Year
sakal
-मयूरेश प्रभुणे
पुणे : पावसाअभावी खरिपाच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्याचा निर्णय नुकताच घेतला. महाराष्ट्रातही दुष्काळी जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते कृत्रिम पावसाच्या तयारीला लागणारा वेळ आणि उर्वरित हंगामाचे मोजके दिवस पाहता यावर्षी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणे शक्य होणार नाही.