कोकण

शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही; तरीही जोपासला अनोखा छंद!

संदेश सप्रे - सकाळ वृत्तसेवा

देवरूख - ग्रामीण भागात शेती आणि पशुपालनाचा जोडधंदा करताना अनेक जण वेगवेगळे छंद जोपासतात. विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षण न घेता ग्रामीण भागातील अनेकांचे छंद तोंडात बोटे घालायला लावतात. संगमेश्‍वर तालुक्‍यातील चिखली गावातील तुकाराम पंडव यांनाही पशुपालन करतानाच गवतापासून विविध वस्तू बनविण्याचा छंद लागला. आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांनी हा छंद जोपासला असून त्यांच्या हस्तकलेतून निर्माण झालेल्या अनेक वस्तू पाहताना भारावून जायला होते. 

ग्रामीण भागात सर्रास शेतीसाठी पशुपालन केले जाते; मात्र शेतीची कामे हंगामी होतात ती कामे सोडल्यास पशुंसाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. गुरे चरायला सोडली, की बसल्या जागी काहीतरी करायचे, या हेतूने अनेक जण छंद जोपासतात. चिखली गावातील तुकाराम पंडव यांचाही शेती हाच व्यवसाय. याच जोडीला ते पशुपालन करतात. शेती झाली की गुरांना चरायला सोडल्यावर बसल्या जागी करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला. समोरच असलेल्या गवतापासून काहीतरी बनवावे या हेतूने त्यांनी सुरवातीला एक फुलदाणी बनविण्याचा प्रयत्न केला. कोकणात सर्रास माळरानावर बार्डी प्रकारचे गवत उगवते. हे गवत सुकल्यावरही तुटत नाही. याच गवताचा वापर करून त्यांनी मोठ्या मेहनतीने एक फुलदाणी साकारली. आपले कौशल्य यशस्वी झाल्याचे पाहून त्यांनी उन्हात वापरायला होईल अशी गवती टोपी साकारली. टोपीचा प्रयत्नही यशस्वी झाल्यावर त्यांनी विविध आकाराच्या टोप्या बनवल्या आहेत. केवळ गवती कामावरच न थांबता त्यांनी चिव्याच्या कामठ्यांपासून अनेक वस्तूही साकारल्या आहेत. आज वयाच्या ६५ व्या वर्षीही ते उत्साहाने या वस्तू लीलया साकारतात. गवतात सापडणाऱ्या तांबेटी या प्रकाराचा वापर फार पूर्वी चित्रकलेसाठी केला जात होता. याचे गवत मध्यभागी पोकळ असल्याने त्याला ब्रशसारखा आकार देऊन याचा उपयोग होत असे, आता मात्र रेडीमेड ब्रश मिळत असल्याने हे गवतही दुर्लक्षित झाले आहे. याचाही उपयोग करून तुकाराम पंडव विविध वस्तू साकारतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

'VFX कौतुक पुरे! अभिनय कधी करणार?' करण जोहरचा बॉलिवूड कलाकारांना टोला; 'रामायण'च्या चर्चेदरम्यान वक्तव्य व्हायरल

Gokak Waterfall Flowing : गोकाक धबधब्याला मिळाली नवसंजीवनी! हिडकल जलाशयातून पाणी सोडताच पुन्हा प्रवाहित झाला धबधबा, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी साजरा केला बालदिन; केक वाटून मुलांच्या चेहऱ्यावर आणले हास्य

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

SCROLL FOR NEXT