Uday Samant News | Shiv Sena News 
कोकण

उदय सामंतांना मोठा धक्का, शिवसैनिक CM ठाकरेंच्या पाठीशी ठाम

पक्षातील ३७ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट करून बाहेर पडले.

- राजेश शेळके

रत्नागिरी : शिवसेनेत झालेल्या राजकीय भुकंपामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाल्यावर रत्नागिरी तालुक्यावर एकहाती पकड असलेल्या उदय सामंत यांना मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत ९० टक्के निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार केला. मात्र त्यातही सामंत परत येतील, अशी अपेक्षा असणारे अनेक आहेत. (Uday Samant News)

शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधी बंड केल्याने उभी फूट पडली. पक्षातील ३७ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट करून बाहेर पडले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देखील रविवारी एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसैनिक संभ्रमात होते. हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, प्रमोद शेरे आदींच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकारिणीची बैठक झाली. (Shiv Sena News)

यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. मंत्री उदय सामंत यांना पाठिंबा देणारे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. मात्र अशा पडत्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. सर्वच पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी तालुक्यात उदय सामंत यांची एकहाती पकड आहे. सामंत कुटुंबांनी गेल्या साडेसात वर्षांमध्ये पकड आणि विश्वास निर्माण केला होता. त्याच्याशिवाय तालुक्यात पान हालत नव्हते एवढी ही पकड घट्ट होती.

उदय सामंत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढचे पाऊल टाकले होते. तरी आज कार्यकारिणीतील ९० टक्के पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर तालुक्यावर एकहाती अधिकार गाजवणाऱ्या सामंत कुटुंबाला हा मोठा धक्का आहे. यातील काही पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत परत येतील अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात कार्यकारिणीची बैठक झाली. कै. बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना असून आम्ही त्यांचे कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना सोडलेली नाही. त्यांनी त्याच्या कार्यालयावरील सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो ,फलक काढलेले नाहीत. त्यामुळे ते परत येतील, अशी आम्हाला आशा आहे.

- प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT