uday samant
uday samant sakal media
कोकण

'निवडणुकीत गुलाल आमचाच! जनतेचा कौल सेना-महाआघाडीलाच'

सकाळ वृत्तसेवा

सरकारबद्दल जनतेच्या मनात आपुलकी निर्माण झालेली आहे

वैभववाडी : जिल्ह्यातील जनता फसव्या आणि खोट्या विकासाला कंटाळली असून महाविकास आघाडीच्या (mahaviakas aaghadi sarkar) माध्यमातून होत असलेला वास्तवदर्शी विकास जनतेसमोर आहे. त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीत (nagar panchayat election 2021) जनतेचा कौल शिवसेना (Shivsena) महाविकास आघाडीलाच असून निवडणूक निकालानंतर गुलाल आम्हीच उधळणार, असा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पालकमंत्री सामंत (Uday samant) यांची पत्रकार परिषद झाली.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, संदेश पारकर, नंदु शिंदे, मंगेश लोके, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘जनतेला अपेक्षित विकास आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करीत आहोत. त्यामुळे सरकारबद्दल जनतेच्या मनात आपुलकी निर्माण झालेली आहे; परंतु विरोधक फसवा विकास जनतेला दाखवित आहेत. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय देखील ते घेत आहेत; परंतु जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. विकास कोण करू शकते हे आता समजले आहे. आम्ही विकास केल्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत; परंतु ज्यांनी यापूर्वी सत्ता भोगली त्यांनी कोणताही विकास केला नाही हे दिसत आहे.

जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीमध्ये शिवसेना महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. वाभवे वैभववाडीत दोन तृतींयाश जागा आम्ही जिंकणार आहोत. कुडाळ आणि दोडामार्गात देखील पूर्ण बहुमतात आम्ही असणार आहोत. देवगडात देखील बहुमताच्या जवळ आम्ही असू.’’ केंद्रीयमंत्री नारायण राणे हे निवडणुक प्रचारात उतरल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘ते केंद्रीयमंत्री असले तरी या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आपला गड राखण्यासाठी ते प्रयत्न करणार हे निश्चित आहे. तसे करण्यात काहीच गैर नाही.’’

महाविकास आघाडीबाबत विचारले असता ते म्हणाले, 'ज्या-ज्या ठिकाणी शक्य होते तेथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झाली आहे. काही ठिकाणी झाली नसली तरी निवडणुकीनंतर निवडुन आलेले उमेदवार हे महाविकास आघाडीतच समाविष्ट होतील. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे.'

त्यांच्याकडून अपेक्षा नाही

नितेश राणे हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल चांगले बोलतील, अशी अपेक्षा आम्ही कधीच ठेवणार नाही. ते सातत्याने टिकाच करतील हे आम्ही गृहीत धरले आहे, असे मत श्री. सामंत यांनी व्यक्त केले.

तर जठारांची अडचण होईल

प्रमोद जठार हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात चांगली मैत्री आहे; परंतु तरीदेखील ते माझ्याबद्दल चांगले बोलू शकणार नाहीत. कारण आमची मैत्री त्यांच्या पक्षातील नेत्यांना समजली तर त्यांची पक्षात अडचण होईल, असेही सामंत यांनी स्पष्टीकरण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT