Umri RIver Sakal
कोकण

रत्नागिरी : भर दुपारी उमरीला पाणी

सडलेला दरवाजा तुटल्याने घडली घटना; महिला, मुलांचा कल्लोळ

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्वर - मेमध्ये तालुक्यातील उमरे नदीला अचानक पाणी आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. ग्रामस्थांनी उमरे धरण फुटल्याची भीती व्यक्त केली. अनेकांनी धरणाकडे धाव घेतली. याबाबत माहिती घेता उमरे पाझर तलावाचे दरवाजे कामासाठी उघडल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले. मात्र, याची कोणतीही पूर्वसूचना ग्रामस्थांना दिली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आजच्या प्रकारात सुदैवाने काही अनर्थ घडला नाही. संगमेश्वर तालुक्यातील उमरे नदीत आज दुपारी अनेक महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मुले आंघोळीसाठी नदीत पोहत होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक नदीचे पाणी गढूळ झाले. काही वेळात नदीत पाण्याचा मोठा लोंढा आला. हा प्रकार पाहून अनेकांनी उमरे धरण फुटल्याची भीती व्यक्त केली. अनेकांनी धरणाकडे धाव घेतली.

संगमेश्वर तालुक्यातील उमरे पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम गेले महिनाभर सुरू आहे. या तलावाच्या कालव्याचे दोन्ही दरवाजे नादुरुस्त झाल्याने कालव्याला पाणी सोडता येत नव्हते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पीक घेता येत नव्हते. गतवर्षी हे दरवाजे नवीन बसवण्याचे काम ती घेण्यात आले होते. मात्र ते दरवाजे गेली कित्यक वर्ष बंद असल्याने आणि धरणात पाण साठा जास्त असून पाऊस जवळ आल्याने हे काम स्थगित केले होते. आज दुपारी एकच्या सुमारास फणसवणे भांडार वाडी, कळंबस्ते तेलेवाडीतील काही मुले नदीत आंघोळीला गेली असता अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. पाणी वाढते आहे हे पाहताच मुलांनी नदीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला. बघता बघता नदी दुथडी वाहू लागली आणि एकच कल्लोळ सुरू झाला. जवळच काही महिला कपडे धुवत होत्या. त्यांनी त्या मुलाना स्वतःला सावरत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मदतीला तेले वाडीतील नदीकिनारी घर असणारे विनायक पाटील धावले आणि त्यांनी सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले म्हणून अनर्थ टळला. यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. उमरे पाझर तलावाचे काम गेले दोन वर्ष सुरू आहे. गेल्या वर्षी अर्धवट काम झाले. यावर्षी पुढील काम सुरू करण्यात आले. मात्र काम करताना ग्रामस्थांना याची कोणतीही पूर्वसूचना न देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT