Under no circumstances should a covid care center ... 
कोकण

कोणत्याही परिस्थितीत कोविड केअर सेंटर नको...

निलेश मोरसकर

बांदा : कास-शेर्ले सीमेवरील डिवाईन मर्सी येथे कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला सरपंचांच्या संयुक्त बैठकीत जोरदार विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारु देणार नाही, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. पंचक्रोशीतील मडूरा, शेर्ले, कास, इन्सुली, पाडलोस, निगुडे व रोणापाल ग्रामपंचायतीमार्फत सरपंचांच्या सहीचे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 

कास डिवाईन मर्सी येथे कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्याचा आदेश सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर शेर्ले पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या या निर्णयाबद्दल पंचक्रोशीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे शेर्ले ग्रामपंचायत कार्यालयात पंचक्रोशीतील सरपंचांची तातडीची बैठक सरपंच जगन्नाथ धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मडूरा सरपंच साक्षी तोरसकर, इन्सुली सरपंच पूजा पेडणेकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, कास सरपंच खेमराज भाईप आदी उपस्थित होते. 

यावेळी सर्वच गावच्या सरपंचांनी ग्रामस्थांच्या संतप्त भावना मांडल्या. कोविड केअर सेंटर उभारल्यास पंचक्रोशीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. कोविड केअर सेंटर उभारण्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. सर्व सरपंचांचे कोविड सेंटर उभारणीला विरोध असल्याबाबतचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना शुक्रवारी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. निगुडे व रोणापाल सरपंच यांनीही निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

Kolhapur Municipal : १० कोटींच्या थकबाकीसाठी धडक कारवाई; जलसंपदा विभागाचे २४ विभाग सील

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT