गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम
Latest Marathi News Update : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना मतदान यादीतून वगळण्यासाठी दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. यामुळे ४९२ सर्व दूध संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम राहिला. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी. एस. नरसिंही आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली.
‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त झाल्यापासून या ना त्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली. अवसायनातील संस्थांचा मुद्दा यापूर्वी विभागीय उपनिबंधक आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्येही उपस्थित झाला होता. तिथे अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार दिला. यानंतरही श्रीराम दूध संस्था आणि श्री काडसिद्धेश्वर संस्था यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याची सुनावणी झाली.