with the use of valueless product gardening in chiplun ratnagiri 
कोकण

आवड असली की सवडही मिळते; टाकाऊ वस्तूंपासुन तयार केला बगीचा

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील मिरजोळी येथील अक्षता उर्फ रूपा संतोष कदम यांनी महिला बचत गट, ग्रामसंघ, नियमित टेलरिंगचा व्यवसाय आणि संसाराचा गाडा हाकत विविध प्रकारची झाडे लावण्याचा छंद मोठ्या जिद्दीने जोपासला आहे. टाकाऊ असलेल्या बाटल्या, खराब टायर, टब आदी विविध वस्तूंचा वापर करीत त्यांनी घर परिसरात शेकडो झाडे लावली आहेत. नारळाच्या खोडातही विविध झाडे लावून त्यांनी कल्पकता दाखवली आहे. घराचा परिसर नियमित हिरवागार ठेवला आहे. 

मिरजोळी येथील गेल्या काही वर्षापासून महिला बचत गटात सक्रिय असलेल्या अक्षता कदम यांना बालपणापासून झाडांची आवड; मात्र काही वर्षे ही आवड त्यांना जोपासता आली नव्हती. मिरजोळी -भोरजेवाडी येथील संतोष कदम यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांनी काही झाडे लावली. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना झाडे लावून त्याचे संगोपन करण्यास वेळ मिळू लागला.

गेल्या काही वर्षात त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करीत शेकडो झाडे लावली आहेत. नारळाच्या खोडात 25 हून अधिक प्रकारची झाडे लावून त्यांनी मनमोहक बगीचा फुलवला आहे. कुंड्यांना जुने लेगीज लावून सजविण्याचा अनोखा प्रयत्न केला. काही झाडांच्या टोकाला अंड्याचे कवच लावले असून येथे येणार्‍या सर्वांचे ते लक्ष वेधून घेते. या फुलझांडासाठी त्या शेणखत, लेंडी वापरतात. हा छंद जोपासण्यासाठी त्यांना पती संतोष कदम, मुलगी मृणाली आणि मुलगा मयुर यांची चांगली साथ मिळते. 

पहिला कडक लॉकडाउन सुरू झाला त्या वेळी मास्कला चांगली मागणी होती; मात्र बचत गटाच्या महिला पुढाकार घेत नव्हत्या. त्या वेळी अक्षता कदम यांनी अडचणीवर मात करीत हजारो मास्क शिवले. त्यातून चांगले उप्तन्नही मिळाले. पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. आवडी जोपासताना त्यांनी बचत गटाचे सचिव, ग्रामसंघाच्या लिपिक पदाची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे पेलली आहे. 

"कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत आवड जोपासताना कसरत करावी लागते. वानरांपासून झाडे सुरक्षित राहण्यासाठी त्याकडे लक्ष ठेवावे लागते. या कामातून एक वेगळा आनंद मिळतो. घर परिसरातील वातावरणही प्रसन्न राहते."

- अक्षता कदम, मिरजोळी (ता. चिपळूण)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT