Vachankatta
Vachankatta sakal
कोकण

रत्नागिरी : वाचनकोपरा ते फिरता वाचनकट्टा तोही दुर्गम भागात

राजेश कळंबटे

रत्नागिरी : वाचनसंस्कृती वाढविण्याचा ध्यास घेतलेल्या एका शिक्षकाने माचाळच्या पायथ्याशी असलेल्या सालपे (ता. लांजा) या दुर्गम गावात (Remote area)वाचन चळवळ सुरू केली आहे. शाळेत वाचनकोपरा, गावात वाचनकट्टा, फिरता वाचनकट्टा,(Vachankatta) वाचनतास असे उपक्रम चालविले आहेत. वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचला नाही तर पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत आहे. पुस्तके (books)घराघरांत पोहोचण्यासाठी मुले पुस्तकदूत म्हणून काम करत आहेत. ही चळवळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकांत पाटील यांनी राबवली आहे.

गेल्या सात वर्षांत मुलांसह पन्नासहून अधिक गावकऱ्यांना वाचनाची सवय जडली. गावातील तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच करिअर मार्गदर्शनावर पाटील यांनी भर देणारे उपक्रम राबविले आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना वाचनाचे महत्त्व लक्षात आले. त्यातून मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी सालपे शाळेत ‘वाचन कोपरा’ चालू केला. गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्रांचे वाचन केले जाऊ लागले. वाडीतील एका माघी गणेशोत्सव मंडळाकडे ‘वाचन कट्टा’ संकल्पना मांडली आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम फिरता वाचनकट्टा सुरू केला. त्या मंडळानेच सुरवातीला पुस्तके देणगीदाखल दिली. देणगीदारांमुळे सुमारे तीनशेहून अधिक पुस्तके या कट्ट्यावर उपलब्ध आहेत. ही पुस्तके लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पुस्तकदूत तयार केले. विद्यार्थी स्वतः पुस्तके वाचताना ग्रामस्थांना ती पुस्तके पोचवतात. टाळेबंदीत हा उपक्रम ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरला. त्यानंतर पाटील यांनी फिरता वाचनकट्टा संकल्पना अमलात आणली. त्यासाठी कुणाच्या घरी, शाळेत, मंदिरात, परसबागेत, वाडीवस्तीवर विद्यार्थ्यांसह कुटुंबातील लोकांना एकत्रित आणून चर्चा घडवून आणली.

कोरोना काळात वाचनतास

शाळा बंद काळात मुलांची वाचनाची सवय कमी होऊ नये, यासाठी ‘वाचनतास’ सुरू केला. सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत विद्यार्थ्यांनी शामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे वाचन होते. हा उपक्रम आजूबाजूच्या गावातही सुरू केला. आजरा तालुक्यातील (जि. कोल्हापूर) अतिदुर्गम कितोडे येथील वाडीत वाचनकट्ट्याचा उपक्रम सुरू आहे. त्यांना पुस्तके पाटील यांनी भेट दिली आहेत.

जिल्हा परिषद शाळेतील मुलांनाच नव्हे तर गावातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व्हावे, ग्रामस्थांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवित आहे.

- श्रीकांत कृष्णा पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT