कोकण

#FormalinCase मासळी बंदी प्रश्‍नावर लवकरच तोडगा - वैभव नाईक

सकाळवृत्तसेवा

मालवण - गोवा शासनाने जिल्ह्यातील मासळीवर घातलेल्या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेत लक्ष वेधण्यात आले आहे. शिवाय मंत्रीमंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. गोवा शासनाच्या संपर्कात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे असून मुख्यमंत्री गोवा शासन, प्रशासनाशी लवकरच चर्चा करतील. त्यामुळे या प्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल, असा विश्‍वास आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, किसन मांजरेकर, किरण वाळके, गणेश कुडाळकर, सेजल परब, सुनीता जाधव, दीपा शिंदे, संमेश परब, तपस्वी मयेकर, स्वप्नील आचरेकर, गौरव वेर्लेकर, शैलेश भोगले, महेश देसाई आदी उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग ते गोवा हे अंतर फार कमी आहे. शिवाय येथील मासळी वाहतूक वाहनधारकांकडून अन्न व आरोग्य कायद्याचे उल्लंघन होत नाही. मात्र गोवा शासनाने मासळी बंदीचा घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे. त्यामुळे याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच महाराष्ट्र व गोवा शासन सकारात्मक चर्चेअंती समाधानकारक तोडगा निघेल.

- वैभव नाईक 

येथील बंदरातून नौका पळून गेल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या हा प्रकार लक्षात घालून दिला. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मत्स्य आयुक्तांना जाबही विचारला. पळून गेलेल्या नौकेबाबत मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांना अभय न देता त्यांचे परवाने रद्द केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. 

नोटिसांमुळे राजकारण नको 
बंदर जेटीसाठी 4 कोटी आणि टर्मिनलसाठी 3 कोटी मंजूर झाले आहेत. बंदर जेटी परिसरात ज्याठिकाणी काम होणार आहे त्याच व्यावसायिकांना नोटिसा काढल्या आहेत. जुन्या व्यावसायिकांवर अन्याय न करता त्यांची टर्मिनलमध्ये व्यवस्था केली जाईल. नोटिसा काढल्या म्हणून कोणीही राजकारण करू नये. पर्यटकांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT