कोकण

राणेंनी एकतरी बैठक उधळून दाखवावी

सकाळवृत्तसेवा

मालवण - जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांसंदर्भात बैठका घेण्याचा अधिकार पालकमंत्री, सत्ताधारी आमदारांना आहे. यामुळे आमदार नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील एकतरी बैठक उधळून लावण्याचे धाडस दाखवावे. आम्ही बैठक घेण्यासाठी सक्षम आहोत, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला.
आमदार नीतेश राणेंनी नुसती आव्हाने देत बसण्याऐवजी कणकवलीवासीयांना दिलेल्या आश्‍वासनांचे पुढे काय झाले 
याचा खुलासा करावा, असेही नाईक यांनी सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. आमदार राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुरुपयोग पालकमंत्री, आमदार यांच्याकडून होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थित होणाऱ्या बैठका उधळून लावू, असा इशारा दिला होता. यावर नाईक यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, ‘‘महामार्गाच्या रुंदीकरणात कणकवली शहरासाठी जादा दर दिला जाईल. एक इंचही जमीन जादा घेतली जाणार नाही, असे आश्‍वासन आमदार राणे यांनी कणकवलीवासीयांना दिले होते. आश्‍वासने देऊन आमदार मुंबईला पळाले. सद्यःस्थितीत कणकवलीवासीयांना एकही रुपया जादा मिळालेला नसून ठेकेदार बिनधास्तपणे काम करत आहे. कणकवलीतील आवश्‍यक सर्वच्या सर्व जमीन ठेकेदाराकडून रस्त्यासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे कणकवलीवासीयांना सर्वकाही कळून चुकले आहे.’’

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मच्छीमारही एकप्रकारे शेतकरी असल्याने त्यांचीही खावटी कर्जे माफ व्हावीत यासाठी कृषी राज्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी यासाठी सहमती दर्शविली असून, याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार आहे. मच्छीमारांच्या डिझेल परताव्यासाठी सलग दोन वर्षे आपण प्रयत्न केल्यानंतर मच्छीमारांच्या खात्यामध्ये डिझेल परताव्याची रक्‍कम जमा झाली होती. यामध्ये काही ठिकाणी सोसायट्या अडचणीत येण्याची शक्‍यता असताना मच्छीमारांच्या खात्यात रक्‍कम जमा करताना सोसायट्यांची ना हरकत घेण्यात यावी यासाठी आपण सोसायटी प्रतिनिधींना घेत मत्स्योद्योग मंत्र्यांची भेट घेतली. यासंदर्भात येत्या ५ तारखेला मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. लवकरच यावरील कार्यवाही होईल.’’

निवडणुकांच्या चाहुलीने मच्छीमारांची आठवण
चांदा ते बांदा योजनेतून गरीब मच्छीमारांना थेट दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मच्छीमारांच्या पाठीशी आम्ही सदैव असून, यापुढेही राहणार आहोत. निवडणूक जवळ आल्यानेच राणे कुटुंबीयांना मच्छीमारांची आठवण होत असल्याची टीका नाईक यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT