मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजपचे पालीत तीव्र आंदोलन Sakal
कोकण

Raigad News : कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजपचे पालीत तीव्र आंदोलन; सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद

प्रतिमेला जोडे मारून निषेध

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमानजनक विधान केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी (ता.9) पाली शहर भाजपतर्फे पालीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रियांक खर्गे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व घोषणा देत निषेध करण्यात आला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी व समाज कल्याणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले अशा स्वातंत्र्यवीरांचा अपमान हा सर्व महापुरुषांचा व या देशाचा अपमान आहे.

भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रातील जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही. तरी त्यांच्या या विधानाचा पाली शहर भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनाचे सर्व नियोजन पाली शहर सरचिटणीस सुशील शिंदे यांनी केले होते.

या आंदोलनात महाराष्ट्र भाजप कार्यकारणी सदस्य राजेश मपारा, जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, पाली शहर सरचिटणीस सुशील शिंदे, नगरसेवक पराग मेहता, नरेश खाडे, प्रणाली शेट, योगिता द्रविड,

वासूदेव मराठे, प्रदीप (दादू) गोळे, राजेंद्र गांधी, प्रदीप तिवारी, वैभव जोशी, गणेश चौधरी, परशुराम निंबाळकर, निलेश पवार, रवी ठोंबरे, अजित खंडागळे, श्री. थोरवे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT