कोकण

Vidhan Sabha 2019 : ...अन्यथा कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही, तर ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार कुणबी समाजाच्या बैठकीत केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दापोली शहरातील नवभारत छात्रालयाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात कुणबी समाजोन्नती संघाच्या दापोली शाखेची बैठक झाली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कुणबी समाजप्रणित उमेदवाराने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांना घाम फोडला होता. तब्बल २० हजार मते मिळवून शिवसेनेचे दापोली विधानसभा मतदारसंघात २५ वर्षे वर्चस्व असलेल्या सूर्यकांत दळवी यांच्या वर्चस्वाला मोडीत काढले. या निवडणुकीत सूर्यकांत दळवी यांचा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे कुणबी समाजाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बैठकीत अनेक राजकीय बाबींना स्पर्श करण्यात आला. तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. यावेळी मागणी करूनही कोणत्याही राजकीय पक्षाने कुणबी उमेदवार न दिल्यास स्वबळावर लढण्याचा निर्धार केला. याबाबत कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या कोर्टात निर्णयासाठी चेंडू टाकण्यात आला. या सभेला कुणबी समाजोन्नती संघ, शाखा दापोलीचे अध्यक्ष  रमेश पांगत, रवींद्र घडवले, संदीप राजपुरे, रामचंद्र पड्याळ, शशिकांत धाडवे, वसंत येसरे यांच्यासह राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेले पदाधिकारी उपस्थित होते.

काशिनाथ पोसकर लढण्यास इच्छुक
दरम्यान, कुणबी समाजोन्नती संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ पोसकर यांनी कोणत्याही राजकीय पक्षाने समाजाला उमेदवारी न दिल्यास आपण स्वतः समाजाकडून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT