Vilas Rahate of Devrukh world record for the smallest rangoli ratnagirri kokan marathi news 
कोकण

देवरुखात साकारले अवघ्या ३ सेमी मध्ये शिवराय; विलास ने केला सर्वात लहान रांगोळीचा विश्व विक्रम पार

अमित पंडित

साखरपा (रत्नागिरी)  : देवरुख येथील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी सर्वात लहान रांगोळी काढून विश्वविक्रम केला आहे. ३ सेंटीमीटर एवढ्या लहान चौकोनात रहाटे यांनी शिवप्रतिमा साकारून हा विक्रम केला आहे. मुळचे चिपळूण येथील आणि शिक्षणानिमित्य देवरुख येथे स्थायिक झालेले रांगोळी कलाकार विलास रहाटे हे व्यक्तीचित्रात्मक रांगोळीसाठी प्रसिद्ध आहेत. 

आज पर्यन्त त्यांनी अनेक व्यक्तीरेखा आपल्या रांगोळीतून साकारल्या आहेत. नुकताच त्यांनी सर्वात लहान रांगोळीचा विश्वविक्रम केला आहे. ३ सेंटीमीटर चौरसात त्यांनी शिवरायांची प्रतिमा साकारली. ४२ मिनिटे आणि ३७ सेकंदात त्यांनी अवघ्या ६ ग्रॅम रांगोळीतून ही प्रतिमा साकारत विश्व विक्रम केला. या आधीचा ५ सेंटीमीटर रांगोळीचा विक्रम रहाटे यांनी मोडला आहे. लॉक डाऊन काळात रहाटे यांनी या विक्रमासाठी सराव केला होता. विलास रहाटे यांच्या विक्रमाची नोंद आए इ ए बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली असून त्यांच्या विक्रमाला मान्यता दिली आहे. 

लवकरच रहाटे यांना आए इ ए कडून सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरवण्यात येणार आहे.  यापुढे स्वत:चाच विक्रम मोडण्याचा मानस रहाटे यांनी व्यक्त केला आहे. पाच रुपयांच्या नाण्याच्या आकारात रांगोळी काढणे आणि पाण्यावर तरंगणारी रांगोळी काढणे हे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रहाटे यांच्या या विश्व विक्रमासाठी निरीक्षक म्हणून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, आठल्ये पित्रे सप्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेंद्र तेंडोलकर आणि कलाशिक्षक विष्णु परीट यांनी काम पाहिले. 

 गेले वर्षभर मेहनत घेत होतो. लॉक डाऊनच्या काळाचा उपयोग सरावासाठी केला. विक्रमामुळे स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे. भविष्यात हाही विक्रम मोडण्याचा प्रयत्न असेल.  

विलास रहाटे, रांगोळी कलाकार            
  

३ सेंटीमीटर चौरसात शिवप्रतिमा साकारत विक्रम 

४२ मिनिटे ३७ सेकंदात रांगोळी तयार  

अवघ्या ६ ग्रॅम रांगोळीचा वापर 

आए इ ए बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल 
 
लॉक डाउनच्या काळात कसून सराव   
   

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT