elections
elections Sakal
कोकण

जिवंत मतदाराला केले मयत; मतदार यादीतील भोंगळ कारभार उघड

एकनाथ पवार

मतदान अधिकाऱ्यांनी मतदार यादीत त्यांचे नाव पाहिले असता ते चक्रावुन गेले.

वैभववाडी : हयात मतदाराला मतदारयादीमध्ये मयत करण्याचा धक्कादायक प्रकार वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रभाग ८ मध्ये घडला आहे. (Political news) भिकाजी सहादु वाडीले असे त्यांचे नाव असुन मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यास परवानगी देण्यात आली. (nagar panchayat election 20

वाभवे वैभववाडी (vaibhavwadi) नगरपंचायतीची निवडणुक मतदान प्रकियेला आज सकाळी साडेसात वाजल्यापासुन सुरूवात झाली. १७ पैकी १३ प्रभागांची निवडणुक होत आहे. यातील प्रभाग क्रमांक आठ मधील मतदार भिकाजी सहादु वाडीले हे बारा वाजण्यच्या सुमारास मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी अर्जुन रावराणे विद्यालयातील मतदान केंद्रावर (Voting Centers) केले. मतदान अधिकाऱ्यांना त्यांनी ओळखपत्र दाखवले. मतदान अधिकाऱ्यांनी मतदार यादीत त्यांचे नाव पाहिले असता ते चक्रावुन गेले.

वाडीले यांच्या नावावर चक्क मयत असल्याचा शिक्का मारण्यात आला होता. त्यामुळे मोठ पेच निर्माण झाला. वाडीले यांना बाहेर थांबविण्यात आले. मतदान अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला. त्यानंतर वरिष्ठांनी वाडीले यांना मतदान करण्यास परवानगी द्यावी असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. हयात असलेल्या मतदाराच्या नावावर मयताचा शिक्का मारल्यामुळे हा प्रकार घडला आहे.या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. मतदार यादी तयार केल्यानंतर यादीतील कोण मयत आहेत हे समजण्यासाठी निवडणुक विभागातील कर्मचाऱ्याने मयत नावावर शिक्का मारला होता. तो चुकुन वाडीले यांच्या नाव असलेल्या ठिकाणी पडल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

"प्रभाग क्रमांकमधील भिकाजी वाडीले यांच्या घरातील अन्य व्यक्ती मयत असुन तिचे नाव मतदार यादीत आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सोयीचे व्हावे याकरीता मयत असलेल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या नजर चुकीमुळे वाडीले यांच्या नावावर शिक्का बसला. परंतु निर्माण झालेला गुंता तत्काळ दुर करण्यात आला. त्यांना मतदान करण्यास देण्यात आले आहे."

- सुरज कांबळे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, वाभवै वैभववाडी नगरपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT