water 
कोकण

एमआयडीसीची मुख्यजलवाहिनी फुटून पाणी गळती

लक्ष्मण डूबे

रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात बीग कोला कंपनीजवळ एमआयडीसीची कमकुवत झालेली मुख्यजलवाहिनी फुटून अधुन मधुन मोठी पाणी गळती होत होती. पाणी गळती रोखण्यासाठी एमआयडीसीने उपाय योजना करावी आशी मागणी कारखानदांर आणि नागरिकांनी केली होती. या मागणीच्या सकाळने बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. दरम्यान  एमआयडीसीने जुनी जलवाहिनी काढुन नवीन जलवाहिनी टाकली आहे. पाणी गळती थांबली असल्याने कारखानदांर आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या कैरे येथील जलशुध्दीकरण केंद्रातुन पाताळगंगा, अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने तसेच वडगाव, जांभिवली, कराडे खुर्द, चावणा आदि ग्रामपंचायतीच्या हद्दितील सुमारे पंधरा गावांना पाणी पुरवठा करण्यात येते आहे. मुख्य रस्त्याच्याकडेला बीग कोला कंपनी जवळ एमआयडीसीची कमकुवत झालेली मुख्य जलवाहिनी कित्येक महिन्यापासुन अधुन मधुन फुटुन मोठी पाणी गळती होत होती. गळतीतुन भरपूर पाण्याची नासाडी होत असल्याने कारखानदांर आणि नागरिक नाराजी व्यक्त करत होते. सकाळने या गळतीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. या बातम्यांची दखल एमआयडीसीने घेतली. जिर्ण झालेली जलवाहिनी काढुन त्याठिकाणी नवीन जलवाहिनी टाकली आहे. त्यामुळे रसायनी पाताळगंगा परीसरातील मोठी पाणी गळती एमआयडीसीने थांबली आहे. तसेच पाण्याचा दाब वाढला असल्याने कारखानदांर व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

कमकुवत झालेली पाईपलाईन अधुन मधुन फुटून पाणी गळती होत होती. पाणी गळतीवर तात्पुर्ती उपाय योजना केली मात्र गळती थांबली नाही. म्हणुन सुमारे आठशे मीटर कमकुवत झालेली पाईपलाईन काढुन नवीन टाकली आहे असे एमआयडीसीच्या अभियंत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT