water supply scheme issue sawantwadi konkan sindhudurg
water supply scheme issue sawantwadi konkan sindhudurg 
कोकण

असमान पाणी प्रश्‍नावरून सावंतवाडीत खडाजंगी

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील शहरासाठी 46 कोटी रूपयांची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. येत्या 2 वर्षांत हा ही योजना पूर्णत्वास येणार असून 24 तास पाणी उपलब्ध होणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पार पडलेल्या पालिका सभेमध्ये सांगितले. या ठरावाचे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकाच्या गटांनी स्वागत केले. शहरात होणाऱ्या असमान पाणी प्रश्‍नावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत आरोप प्रत्यारोप झाले. 

नगराध्यक्ष परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणी प्रश्‍नावर जोरदार गदारोळ झाला. शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी नळ पाणीपुरवठा साठवण टाकी पाणी सोडू नये, टाकी भरली का जात नाही?, नवीन कनेक्‍शन का दिली गेली? असे प्रश्‍न उपस्थित केल्यावर सत्ताधारी नगरसेवक नासिर शेख यांनी पाणीपुरवठ्यासाठी आलेले पैसे परत का गेले? याला मागील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केला. इतकी वर्षे हा प्रस्ताव पडून का होता? असाही सवाल केला. सुरेंद्र बांदेकर यांच्यासह या चर्चेमध्ये डॉ. जयेंद्र परुळेकर आणि अनारोजीन लोबो यांनी भाग घेतला. बांदेकर यांनी ज्यांना प्रश्‍न केला ते उत्तर देतील असे सांगितले.

याला सुधीर आडीवरेकर, नासिर शेख यांनी प्रत्युत्तर दिले. नगराध्यक्ष परब यांनी हस्तक्षेप करून शहराला 24 तास पाणीपुरवठा काही वर्षांमध्ये मिळेल. दोन वर्षांत ही नवीन नळपाणी योजना कार्यान्वित होईल. जीवन प्राधिकरण विभागाचीही नळपाणी योजना मंजूर करून आणण्यासाठी आपण सातत्याने पत्रव्यवहार केला. मुंबई, ठाणे येथे आपण स्वतः जाऊन कार्यालय मध्ये बसून ही योजना मंजूर करून आणल्याचे सांगितले. 

सर्वसाधारण सभेमध्ये विविध मंजूर कामाबद्दल लोबो यांनी आक्षेप घेतला. ही सर्व कामे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर केल्याचे सांगितले. यावर नगराध्यक्ष परब यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ही कामे मंजूर झाल्याचे सांगून त्यावेळी पालकमंत्री केसरकर होते; मात्र माजी मुख्यमंत्र्यामुळे या कामासाठी निधी मिळाल्याचे सांगितले.

फडणवीस सरकारच्या काळामध्ये केसरकर यांनी निधी आणला; मात्र यापूर्वी 3 कोटी 90 लाख रुपयांचा निधी आला होता. आता 2 कोटी 37 लाखांचा निधी आला. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारमध्ये पूर्वीपेक्षा कमी निधी आल्याचे परब यांनी सांगितले. यावर लोबो यांनी कामाचा पाठपुरावा आमदार केसरकर यांनी केला. त्यामुळे निधी आल्याचे सांगितले. नरेंद्र डोंगराकडे जाणारा रस्ता या नवीन कामांमध्ये प्रस्तावित केला नसल्याची बाब उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सभागृहासमोर ठेवली. यावेळी चर्चेत भाजप गटनेते राजू बेग, शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी सहभाग घेतला. 

माजगाव, चराठेचा पुरवठा बंदचा निर्णय 
या सभेमध्ये माजगाव आणि चराठे गावातील पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दोन्ही गावांसाठी जीवन प्राधिकरण विभागाने स्वतंत्र नळपाणी योजना कार्यान्वित केल्यामुळे पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय झाला. यासाठी 90 दिवसांची वेळ देण्याचा ठराव या सभेमध्ये घेण्यात आला व तशी सूचना त्या गावांना देण्याचे संमत करण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT