कोकण

बिबट्याच अडकलाय समस्यांच्या गर्तेत

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - मानवाने निसर्गावर अतिक्रमण केल्याने जंगले नष्ट होत चालली आहेत. परिणामी बिबट्याचा नागरी वस्तीतील वावर वाढला. माणूस बिबट्याचा भक्ष्य नाही. बिबट्याच्या जवळ गेलो तरी तो सहजासहजी हल्ला करीत नाही. जखमी अथवा बिथरलेलाच बिबट्या माणसावर हल्ला करतो. अलीकडे माणूस नाही, तर बिबट्याच समस्यांच्या गर्तेत अडकला आहे, असे मत बीबीसी वर्ल्ड लाईफ पुरस्कारप्राप्त नयन खानोलकर यांनी व्यक्त केले. 

प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार खानोलकर चिपळुणात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निसर्गातील माणसांचा हस्तक्षेप वाढला आहे. बिबट्याला नियमित जागेची अचूक माहिती असते. जागेच्या खुणेबाबत त्यांना सेन्स असतो. निसर्गनिर्मित असलेले ग्रीन झोन गायब झाले आहेत. हा प्राणी भित्रा असून तो माणसाला घाबरतो. जखमी अथवा बिथरलेलाच बिबट्याच मानवी समुदायावर हल्ला करीत असल्याच्या घटना घडत आहेत. कुत्री, गाय, म्हैस, शेळ्या हेच त्याचे मुख्य खाणे आहे. भुकेमुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या नागरी वस्तीत येतो. बिबट्यांच्या अधिवासाची छायाचित्रे घेताना गेल्या सहा वर्षात एकदाही हल्ला केलेला नाही. तीन-चार फुटांवरून बिबट्याची छायाचित्रे घेतली. जंगलातील अतिक्रमणे वाढल्याने अधिवास संपुष्टात येत आहे. 

‘‘माणसाला घरासाठी जंगलाचा लूक पाहिजे मात्र जंगलातील प्राणी मात्र त्यांना नको आहेत. प्राण्यांना नैसर्गिक आरोग्य व अधिवास महत्त्वाचा आहे. मानवनिर्मित ग्रीनझोन करण्यापेक्षा आहेत ती जंगले टिकवली पाहिजेत.’’
- नयन खानोलकर

फॅट वाढणाऱ्या खाद्यामुळे बिबटे लवकर वयात
सरासरी दोन वर्षांनी बिबट्या वयात येतो. मात्र अलीकडे फॅट वाढणारे खाद्य त्यांना मिळत असल्याने ते लवकर वयात येतात. परिणामी प्रजनन लवकर होण्यास सुरवात होते. यातून बिबट्यांची संख्या वाढते. बिबट्याचे सरासरी आयुर्मान १५ वर्षे असल्याचे खानोलकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT