sakal
कोकण

सर्वात मोठ्या "स्वराज्य ध्वजाचे" बल्लाळेश्वर मंदिराजवळ पूजन

आमदार रोहितदादा पवार यांच्या भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज या संकल्पनेने साकारलेल्या भारतातील सर्वात मोठ्या भगव्या "स्वराज्य ध्वजाचे" सोमवारी (ता.27) सायंकाळी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर मंदिरा जवळ पूजन करण्यात आले.

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : आमदार रोहितदादा पवार यांच्या भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज या संकल्पनेने साकारलेल्या भारतातील सर्वात मोठ्या भगव्या "स्वराज्य ध्वजाचे" सोमवारी (ता.27) सायंकाळी अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर मंदिरा जवळ पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा, सुधागड अध्यक्ष रमेश साळुंके, तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, पंचायत समिती सदस्या साक्षी दिघे, महिला तालुका अध्यक्ष रुपाली भणगे, पाली शहर अध्यक्ष सुजाता वडके, अयोध्या शिंदे, सुलतान बेणसेकर, दिनेश बुरुमकर, डॉ. जयवंत जाधव व किरण मढवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सर्वसमावेशक ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते व्हावे अशी लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी या ध्वजाचे पूजन होत आहे. 37 दिवसांच्या प्रवासात स्वराज्य ध्वज सहा राज्यांमधून बारा हजार किलोमीटर प्रवास करेल. या दरम्यान विविध धार्मिक आध्यात्मिक स्थळे व स्मारके अशा ऊर्जा केंद्र असलेल्या 74 ठिकाणी ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन होईल. देशभरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी प्रातिनिधिक पूजन झाल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोंबरला हा स्वराज्य ध्वज उभारला जाईल.

ध्वजाचे वैशिष्ट्य

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1674 साली झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या ध्वजाच्या स्तंभाचे वजन 18 टन आहे. स्वराज्य ध्वजाचा आकार 96 बाय 64 फुट. वजन 90 किलो आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT