Youth Killed In Sudden Explosion In Forest Of Kariwade 
कोकण

शिकारीसाठी गेलेल्या बंदूकीचा अचानक बार उडाला अन्...

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कारिवडे येथील जंगलात ठासणीची बंदूक घेऊन शिकारीसाठी गेलेल्या युवकाच्या बंदुकीचा अचानक बार उडून झालेल्या स्फोटात तरुणाचा मृत्यू झाला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले होते; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अभिजित रामचंद्र पोकळे (वय 28, रा. कारिवडे गावठाणवाडी) असे मृत युवकाचे नाव असून ही घटना काल (ता. 20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत त्याचा भाऊ एकनाथ रामचंद्र पोकळे यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली असून याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कारिवडे गावठाणवाडी येथील अभिजित पोकळे या युवकाच्या घरात शेती संरक्षण परवाना असलेली बंदूक आहे. ती घेऊन तो करिवडे गावच्या सीमेवरील असलेल्या जंगल परिसरात शिकारीसाठी जात असे. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अभिजित जंगलात शिकारीसाठी गेला होता. शिकार करण्यासाठी बंदुकीमध्ये त्याने बार भरला होता.

शिकार करतेवेळी अचानक बंदुकीतील बार जागी पडून स्फोट झाला. यावेळी बंदुकीतील शेरे अभिजितच्या छातीत घुसले. या स्फोटामध्ये त्याच्या उजव्या हातालाही गंभीर दुखापत झाली. यामुळे तो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी अवस्थेत तो तसाच स्वतःला सावरत आपल्या गावठाणवाडी येथील घरी आला. 

याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला हलविले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती येथील पोलिस ठाण्याला प्राप्त होताच येथील सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी घटनास्थळी जात संबंधित प्रकाराचा पंचनामा केला. घटनेमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या अभिजित पोकळे याचा रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात कारिवडे ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. 

बंदूक जप्त 
अभिजित हा गावातील अनेकांचा परिचित होता. तो गेली काही महिने स्वतःचा फॅब्रिकेशन व्यवसाय चालवत होता. त्याच्या अचानक जाण्याने कारिवडे गावठाणवाडी येथील पोकळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजित याच्या मागे दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. अभिजित याच्या मृत्यूच्या बातमीने कारिवडे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अभिजितने शिकारीसाठी वापरलेली ठासणीची बंदूक येथील पोलिसांनी जप्त केली आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevrao Mahadik Sugar Factory : आप्पा महाडिकांच्या कर्नाटकातील बेडकिहाळ साखर कारखान्याचा दर ठरला, सरकारने दिलेल्या दरापेक्षा ५० रुपये देणार जादा

Maratha Community: 'मंगळवेढा सकल मराठा समाज आक्रमक'; मनोज जरांगे-पाटील हत्येचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करा

Karuna Munde: करुणा मुंडेंचा पक्ष निवडणुका लढविणार; संभाजीनगरात दिली माहिती, मराठवाड्यात उभे करणार उमेदवार

US Soldiers: ४०,००० अमेरिकन सैनिक समुद्रात गायब! शास्त्रज्ञ घेत आहेत शोध, नेमकं काय घडलं?

Pratap Sarnaik : मिरा-भाईंदरचा भूखंड नियमानुसारच घेतला; वडेट्टीवारांच्या आरोपांवर परिवहनमंत्र्यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT