महिलाराज
महिलाराज sakal
कोकण

राजापूर पालिकेत येणार महिलाराज

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : राजापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) आरक्षण सोडत काढण्यात आली. २० नगरसेवकांपैकी १० जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यामध्ये एक जागा अनुसूचित जातीसाठी तर उर्वरित नऊ जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. प्रभाग- ५ मध्ये अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या जास्त असल्याने येथील एक जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव केली आहे.

नगर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक हनिफ काझी, गोविंद चव्हाण, अनिल कुडाळी, शीतल

माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, मनसेचे आजिम जैतापकर आदी उपस्थित होते.

ओबीसींना सर्वसाधारणमधून लढवावी लागणार..

ओबीसी आरक्षणामुळे यापूर्वी नगरपालिकेमध्ये ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून काही उमेदवार नगर पालिकेमध्ये निवडून येत होते; मात्र ओबीसी आरक्षणाचा घोळ अद्यापही सुटला नसल्याने या वेळच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. त्यामुळे सोडतीमध्ये ओबीसींसाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना या वेळी सर्वसाधारण जागांवरून निवडणूक लढवावी लागणार आहे.

महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल..

नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकांची संख्या वाढली असली तरी, एकाचवेळी दहा महिला निवडून जाणार आहेत. पालिकेतील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव झाल्याने दांडगा जनसंपर्क आणि निवडून येण्यास सक्षम असलेल्या महिला उमेदवारांचा शोध घेण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT