ODI World Cup
ODI World Cup  esakal
क्रीडा

ODI World Cup : क्रिकेट जगतातील 5 दिग्गज खेळाडू 'विश्वविजेता' होण्याचं ज्यांच स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही; रोहितही होणार सामील?

अनिरुद्ध संकपाळ

ODI World Cup : भारताचे तिसरा वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाने भारताचा मायेदशातच अंतिम सामन्यात 6 विकेट्सनी पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे एकदातरी वर्ल्डकप विजेता होण्याचे स्वप्न देखील भंगले. रोहित शर्माला 2011 च्या वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नव्हते. त्यावेळी तो खूप निराश झाला होता. भारताने तो वर्ल्डकप जिंकला.

रोहित जरी 2015 चा आणि 2019 चा वर्ल्डकप खेळला असला तरी भारतीय संघाला या दोन्ही वर्ल्डकपमध्ये ट्रॉफीवर कब्जा करता आला नाही. रोहितने 2019 च्या वर्लड्कपमध्ये तर 648 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता 2023 च्या वर्ल्डकपमध्ये देखील त्याने 597 धावा केल्या.

वर्ल्डकपच्या बाबतीत कमनशिबी फक्त रोहित शर्माच नाहीये. दिग्गज खेळाडू असून देखील वर्ल्डकप जिंकण्यात अपयश आलेल्या खेळाडूंची लिस्ट मोठी आहे. त्यात अनेक लेजंड क्रिकेटर देखील आहेत. असे पाच क्रिकेटपटू ज्यांना क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत.

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्स हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधला एक दिग्गज खेळाडू असून त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही असं बोललं जातं. मात्र त्याला देखील आपल्या संघाला एकादाही वर्ल्डकप ट्रॉफी जिंकून देता आली नाही. 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकेचा संघ सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. मात्र तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. डिव्हिलियर्सला या पराभवानंतर आपले अश्रू अनावर झाले होते.

ब्रँडन मॅक्युलम

रोहित शर्मासारखा ब्रँडन मॅक्युलम देखील धडाकेबाज फलंदाज होता. त्याने 2015 च्या वर्ल्डकपमध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघाला फायनलपर्यंत पोहचवले. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांचे स्वप्न तोडले. पहिल्याच षटकात मॅक्युलम स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड सामन्यात पुरनरागमन करू शकली नाही.

राहुल द्रविड

भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडला देखील एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. 1999 च्या वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला होता. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये हरला होता. त्यानंतर 2007 च्या वर्ल्डकपमध्ये राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडला होता.

त्याच्याकडे ही वर्ल्डकप न जिंकण्याची सल कोच असताना भरून काढण्याची संधी होती. मात्र फायनलपर्यंत मुसंडी मारून देखील ऑस्ट्रेलियाने पुन्हा त्याचे स्वप्न तोडले.

​ब्रायन लारा

ब्रायन लारा हा क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून गणला जातो. त्याचे वनडे रेकॉर्ड देखील जबरदस्त आहे. मात्र तो आपल्या संघाला कधी वर्ल्ड चॅम्पियन बनवू शकला नाही. आपला शेवटचा 2007 चा वर्ल्डकप तो मायदेशात खेळला होता. मात्र तरी देखील तो वेस्ट इंडीजला पुन्हा वर्ल्ड चॅम्पिनय बनवू शकला नाही.

कुमार संगकारा

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज आहे. त्याने 2007 आणि 2011 मध्ये श्रीलंकेला अंतिम फेरीत पोहचवले होते. मात्र त्याला देखील एकदाही वर्ल्ड चॅम्पियन संघाचा सदस्य म्हणून मिरवता आले नाही. 2015 मध्ये तर तो सलग 4 वर्ल्डकपध्ये शतक ठोकणारा फलंदाज झाला होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT