IND vs AUS Final 2023 : भारताच्या पराभवावर पाकिस्तानी अभिनेत्रीनं डिवचलं, 'आता भारतात...', नेटकऱ्यांनीही तिला सुनावलं!

भारताच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर आता सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
IND vs AUS Final 2023
IND vs AUS Final 2023 esakal

IND Vs AUS Final 2023 India lost pakistani Actress tweet : भारताच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर आता सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अनेक सोशल मीडिया सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारीच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सहर शिनवारीनं भारत हारल्यानंतर पुन्हा एकदा तिरकस प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला आहे. भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात टीव्ही फुटले असतील असे तिनं म्हटले आहे. यावर तिलाही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. त्याचीही चर्चा होत आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

सहर काय म्हणाली माहितीये?

भारत हारला, त्यामुळे आज शेजारच्या देशात भरपूर टीव्ही फुटले असते. असं म्हणत सहरनं एक लाफिंगचा इमोजीही शेयर केला आहे. यानंतर तिनं आणखी काही ट्विट देखीलकेले आहेत. तिनं भारताच्या पराभवावरुन थट्टा उडविणारे मीम्स व्हायरल केले आहेत. तिनं ऑस्ट्रेलियाला विजयाचा खरा दावेदार असे म्हटले आहे. ते कौतुकास पात्र आहेत असे तिचे ट्विट आहे. सहरच्या टविटनंतर ती ट्रोल झाली आहे.

एका युझर्सनं म्हटले आहे की, आम्ही तुमच्या देशातील लोकांप्रमाणे वागत नाही. कसे वागावे हे आम्हाला कळते. तेव्हा भारतातील चाहत्यांची तुलना ही पाकिस्तानी चाहत्यांशी करु नका. दुसऱ्यानं म्हटले आहे की, आम्ही हारल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसारखे वागत नाही. तुम्ही मात्र तसे करता. आणि आमची तुलना तुमच्यासोबत करु लागता. तिसऱ्यानं लिहिलं आहे की, किमान आमच्याकडे फोडण्यासाठी टीव्ही तरी आहेत तुमच्याकडे तर तेही नाहीत.

कोण आहे सहर शिनवारी?

सहर ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची, नेटकऱ्यांची संख्या मोठी आहे. पाकिस्तामध्ये ती भलतीच प्रसिद्ध आहे. सहर ही २०२२ मध्ये चर्चेत आली होती. त्यावेळी टी २० वर्ल्ड कप दरम्यान काही वक्तव्यं केली होती. जर इंडिया हरली तर आपण झिम्बॉवेच्या मुलासोबत लग्न करणार असं ती म्हणाली होती.

सहर ही चर्चेतील अभिनेत्री आहे. तिनं शेर सवा शेर नावाच्या एका कॉमेडी सीरिअलमध्ये काम केले आहे. आता ती तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत येणारी सेलिब्रेटी आहे. ज्यावेळी पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला तेव्हा तिनं बाबर आझमसह बाकीच्या खेळाडूंचा राजीनामा मागितला होता. त्यावरुन मोठा वादही झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com