Cheteshwara Pujara and Hanuma Vihari
Cheteshwara Pujara and Hanuma Vihari 
क्रीडा

World Cup 2019 : तंत्रशुद्ध फलंदाजाची उणीव चांगलीच भासली

मिलींद गुंजाळ

वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची फलंदाजी कधीच स्थिरावली नाही. आपल्याला भरमसाठ अष्टपैलूंऐवजी चेतेश्वर पुजारा किंवा हनुमा विहारी असा तंत्रशुद्ध फलंदाज हवा होता. असे फलंदाज उच्चांकी धावसंख्येच्या सामन्यांत उपयुक्त ठरतात. 

भारतीय संघ 290 ते 325 धावसंख्येचा पाठलाग करू शकतो, पण हेच खेळपट्टी किंचीत प्रतिकूल असेल, चेंडू जरा काही करू लागला तर 230-240 धावसंख्येचा पाठलाग करणे खडतर ठरते. इंग्लंडमध्ये चेंडू मुव्ह होणार हे तुम्हाला गृहीत धरावे लागतेच. या स्पर्धेत बहुतांश खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकुल होत्या, पण उपांत्य फेरीच्या वेळी ढगाळ हवामानामुळे ही खेळपट्टी अपवाद ठरली. 

क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे भारताने 10-12 धावा जास्त दिल्या. विराटने केलेला ओव्हरथ्रो अनावश्‍यक होता. चहलचे क्षेत्ररक्षण ढिसाळ होते. राहुलचे क्षेत्ररक्षण तर फारच सामान्य ठरले. दिनेश कार्तिकबद्दलही हेच म्हणावे लागेल. धक्कादायक म्हणजे मिसफील्ड झाल्यावर ही मंडळी चेहरा हसरा करीत होती. 

रोहित शर्मा उच्चांकी धावसंख्येच्या सामन्यात मोठी खेळी करतो, पण चेंडू स्विंग होत असताना त्याने अशी खेळी केल्याचे अद्याप पाहायला मिळालेले नाही. विराट खालच्या क्रमांकावर येऊ शकला असता. त्यामुळे सुरवातीला मुव्ह होणाऱ्या चेंडूंना सामोरे जाणे तो टाळू शकला असता. याचे कारण त्याची विकेट बहुमोल होती. भारताची अंतिम संघ निवड (प्लेइंग 11) प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. 

जडेजाला आधीच्या सामन्यांत खेळविण्यात आले नव्हते. अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्याऐवजी त्यालाच पहिली पसंती असायला हवी होती. त्याने पंड्यापेक्षा कमी धावा दिल्या असत्या. त्याची फलंदाज म्हणून तो किती जिगरी आहे हे उपांत्य फेरीत दिसून आले. जडेजा सुरवातीपासून खेळला असता तर संघाचे स्वरुप स्थिरावले असते. 

केन विल्यमसन याने खेळपट्टीचा अंदाज जास्त सरस प्रकारे घेतला, जो निर्णायक ठरला. भारतासाठी मात्र प्रश्न कायम राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT