Ahmedabad franchise as Ahmedabad Titans Sakal
क्रीडा

IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या टीमच बारसं; वाचा काय ठेवलं नाव

सुशांत जाधव

अहमदाबाद फ्रेंचायझीनं आपल्या संघाच्या अधिकृत नावाची घोषणा केली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलचा श्रीगणेशा करणाऱ्या या संघाचे नाव 'अहमदाबाद टायटन्स' असे ठेवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या या संघाचे नेतृत्व करणार आहे. फ्रेंचायझीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आल्या संघाच्या नावाची घोषणा केली. (Ahmedabad franchise have announced their team name Ahmedabad Titans)

अहमदाबाद संघासाठी सीव्हीसी कॅपिटल ग्रुपनं मोजलेत 5625 कोटी

आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात दोन नवे संघ सहभागी झाले आहेत. अहमदाबादच्या (Ahmedabad Titan) संघाशिवाय लखनऊचा (Lucknow Super Giants ) संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या रिंगणात उतरणार आहे. 25 आक्टोबर 2021 रोजी या दोन्ही संघाची घोषणा झाली होती. लखनऊसाठी आरपीएसजी व्हेचर्स लिमिटेडनं 7090 कोटी मोजले होते. लखनऊने मागच्या महिन्यात आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली होती.

लखनऊच्या संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 'लखनऊ सुपर जाएंट्स' नावाने मैदानात उतरेल. फ्रेंचायझीचे मालक आणि आरपीएसजी व्हेचर्स लिमिटेड (गोयंका ग्रुप) अध्यक्ष डॉ. संजीव गोयंका यांनी व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून संघाच्या नावाची घोषणा केली होती. लखनऊच्या संघाने 17 कोटी मोजून लोकेश राहुलला आपल्या संघाचे कर्णधारपदी निवडले आहे. त्याच्याशिवाय लखनऊने मेगा लिलावापूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टोयनिसला 9.2 कोटी तर भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोईला 2 कोटीमध्ये आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.

अहमदाबादने लोकल बॉय हार्दिक पांड्याची कर्धार म्हणून निवड केली होती. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खानही अहमदाबाद टायटन्सकडून मैदानात उतरणार आहे. या दोघांसाठी फ्रेंचायझीनं प्रत्येकी 15-15 कोटी मोजले. युवा सलामीवीर शुबमन गिलला फ्रेंचायझीनं 8 कोटीत आपल्या ताफ्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहोत आणि महाराष्ट्र सरकारही यासंदर्भात चर्चा करतंय - सुळे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT