Polish Grand Prix Shooting esakal
क्रीडा

Polish Grand Prix Shooting : अखिल शेरॉन, अनिश भानवाला यांना ग्रांप्रि नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण

अनिरुद्ध संकपाळ

Polish Grand Prix Shooting : पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवणारे नेमबाज अखिल शेरॉन आणि अनिश भानवाला यांनी पॉलिश ग्रांड प्रिक्स चॅम्पियन्स स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.

शेरॉनने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ४६८.४ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पॅट्रिक जेनी या झेकोस्लावाकिया खेळाडूपेक्षा शेरॉनने .२.२ गुणांची अधिक कमाई केली.

भानवाला याने जोसेफ झापेजस्की ग्रांप्रि स्पर्धेत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शेरॉन आणि भानवाला या दोघांच्या या स्पर्धा एका वेळी झाल्या.

भरताचे ५० मीटर आणि २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील काही खेळाडू युरोपमध्ये विविध स्पर्धांत अनुभासाठी सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा सराव महत्त्वाचा आहे.

नौदलाचा नेमबाज निरज कुमार यानेही रायफल थ्री पोझिशन प्रकारात दोन ब्राँझपदके मिळवून प्रभाव पाडला. या स्पर्धेत दोन पदके मिळवणारा तो एकमेव भारतीय ठरला. प्राथमिक फेरीत निरजने ५९५ आणि ५९४ अशी कामगिरी केली.

पहिल्या फेरीत तो रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सेर्थी कुलिशनंतर निरजने दुसरा क्रमांक मिळवला होता. या प्रकारात महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने प्राथमिक फेरीत ५९५ गुणांची कमाई केल, परंतु त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवणाऱ्या श्रीयांका सदांगी आणि अशी चोक्षी यांनी महिलांच्या थ्री पोझिशनमध्ये ब्राँझपदके मिळवली. हे भारतीय नेमबाज आज ड्रॉटमंड येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीला रवाना होणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT